शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
3
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
4
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
5
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
6
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
7
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
8
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
9
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
10
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
11
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
12
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
13
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
14
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
15
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
16
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
17
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
18
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
19
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना

कर्तव्यावर जाणाऱ्या एसटी कंडक्टर महिलेला रेतीच्या ट्रॅक्टरची धडक; अपघातानंतर चालक पसार

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: May 23, 2025 16:21 IST

नवेगाव-एलोरा पेपर मिल रस्त्यावर अपघात, उपचारासाठी भंडाऱ्यात जाण्याचा सल्ला

तुमसर: भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरील नवेगाव-एलोरा पेपर मिल रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये कर्तव्यावर जाणाऱ्या एसटी कंडक्टर महिला भरधाव रेतीच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाली. या महिलेला सुमारे दहा ते पंधरा फूट फरफटत नेवून नंतर ट्रॅक्टरसह चालक अपघात स्थळावरून पसार झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी १० वाजता नवेगाव-एलोरा पेपर मिल रस्त्यावर घडला. ममता पेशने (४५, नवेगाव मनोरा, ता. तिरोडा) असे महिलेचे नाव आहे. 

ममता पेशने या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे एसटी महामंडळाच्या डेपोत चालक व वाहक पदावर कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी ९.४५ वाजता आपल्या दुचाकीने तिरोडा येथे कर्तव्यावर जाण्यास निघाल्या असता, या मार्गावरून भरधाव जाणाऱ्या रेतीच्या ट्रॅक्टरने त्यांना धडक दिली. यामुळे त्या दुचाकीसह रस्त्यावर पडल्या. ट्रॅक्टरने त्यांना सुमारे दहा ते पंधरा फूट फरफटत नेले. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती ममता पेशने यांच्या पतीला दिली. त्यांनी नागिरकांच्या सहाय्याने उपचाराकरिता भंडारा येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

वर्षभरापूर्वी सेवेत रूजू

ममता पेशने या सध्या तिरोडा बस डेपोत वाहक पदावर कार्यरत आहेत. मागील दीड वर्षांपूर्वी त्या नोकरीवर लागल्या. त्या एक उत्तम चालकही असल्याची माहिती आहे. वेळप्रसंगी दोन्ही कर्तव्य त्या पार पडतात, अशी माहिती तुमसर येथील उपआगार व्यवस्थापक रचना मस्करे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

रेती चोरीचा फटका

मनोरा नवेगाव ते एलोरादरम्यान मोठ्या प्रमाणात रेती चोरी आणि अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती आहे. वैनगंगा नदी काठावरून ही रेती चोरी केली जाते. ट्रॅक्टर चालक बेदरकारपणे ट्रॅक्टर चालवतात. त्याच्या फटका स्थानिक नागरिकांना बसतो. काहीप्रसंगी ही अवैध वाहतूक नागरिकांच्या जीवावरही उठत आहे.

टॅग्स :Accidentअपघातstate transportएसटीBus Driverबसचालक