शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

पवनीतील सावरला परिसरात वाघाने घेतला पुन्हा एकाचा बळी; एकाच आठवड्यात दुसरी घटना

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: April 04, 2024 6:58 PM

वाघाचा बंदोबस्त न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार

भंडारा : मोहफुले वेचण्यासाठी कुटुंबियांसह जंगलात गेलेल्या व्यक्तीवर हल्ला करून वाघाने ठार केले. ही घटना पवनी तालुक्यातील सावरला वन क्षेत्रात गुरूवारी दुपारी घडली. ताराचंद लक्ष्मण सावरबांधे (६०, सावरला, ता. पवनी)) असे मृताचे नाव असून एकाच आठवड्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे जनक्षोभ वाढला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ताराचंद सावरबांधे हे आपल्या कुटुंबियांसह मोहफुलें वेचण्यासाठी प्रादेशिक वनविभागाच्या सावरला परिसरातील कंपार्टमेंट ३१३ मध्ये गुरुवारी सकाळी गेले होते. सावरल्यावरून शेळी गावाकडे जाणाऱ्या रोडवरील मोहफुले वेचत परिवारातील मुलगा व पत्नी दुसऱ्या झाडाकडे मोह वेचण्याकरिता गेले. या दरम्यान, वाघाने ताराचंदवर झडप घेतली. यात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे पत्नी व मुलगा हादरून गेले. त्यांनी गावात कळविताच ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली. दरम्यान प्रादेशिक वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांसह घटनास्थळी पोहचून नागिरकांची समजूत घातली. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय पवनी येथे नेण्यात आले. दरम्यान जनतेचा आक्रोश पाहण्यासारखा होता. घटनास्थळी जिल्हा उपवनसंरक्षक राहुल गवई, सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी निलक, डीवायएसपी मनोज सिडाम, ठाणेदार निलेश ब्राह्मणे, यांच्यासह उपसरपंच उत्तम सावरबांधे, शिवसेना नेते अनिल धकाते, प्रशांत भुते इत्यादींनी भेट दिली.वाघाचा बंदोबस्त न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार

सलग घटना घडूनही वनविभाग वाघाचा बंदोबस्त करत नाही. यामुळे शेतीची काम करणे, गुरे राखणे जोखिमीचे झाले आहे. सावरला-कान्हाळगाव क्षेत्र प्रादेशिक कार्यालयांतर्गत येते. लागूनच उमरेड-कऱ्हाडला व्याघ्र प्रकल्प आहे. मात्र वाघाचा संचार सावरला परिसरात जास्त आहे. हे माहीत असूनही काहीच उपाययोजना होत नाही. दखल न घेतल्यास लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातला जाईल, असा इशारा सावरला येथील गावकऱ्यांनी दिला.१० लाखांचा धनादेश

वन विभागाकडून ताराचंद सावरबांधेच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर उर्वरित १५ लाख रुपये फिक्स डीपाझिट करण्यात येणार असल्याचे उपवन संरक्षक राहुल गवई यांनी सांगितले.६ महिन्यात चवथा बळी

यापूर्वी गेल्या आठवड्यात कनहाळगाव येथील महिलेला वाघांने हल्ला करून जिवंत मारले होते. त्या घटनेची शाई वाळत नाही तोच ही घटना घडली. ६ महिन्यात वाघाने सावरला क्षेत्रातील ४ व्यक्तीचा बळी घेतला असून एक व्यक्ती जखमी झाला आहे.