शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव दुचाकी खांबावर आदळली; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 00:10 IST

रामटेक तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील सालई शिवारातील घटना

तुमसर (भंडारा) : रामटेक- तुमसर राष्ट्रीय महामार्गावर सालई शिवारात तुमसरकडे गावी येताना भरधाव  दुचाकी रस्त्याच्या कडेला खांबावर आढळली. त्यात एका तरुणाच्या मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला गंभीर जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. सदर अपघात सालई गाव शिवारात शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडला. मृतक तरुणाचे नाव शुभम प्रकाश भोयर (२५) राहणार बाम्हणी तालुका तुमसर तर गंभीर जखमी तरुणाचे नाव मयूर प्रल्हाद भोयर (२४) राहणार  बाम्हनी असे आहे.

शुभम व मयूर हे दोघेही भावंड काही कामानिमित्त सालई पलीकडील एका गावात गेले होते. रात्री बामणी येथे स्वगावी परत येताना दुचाकी क्रमांक एम. एच.३६ ए. एम.३८३७ एका वाहनाला वाचविताना थेट रस्त्याच्या शेजारी असलेल्या खांबाला भरधाव  दुचाकीने धडक दिली. यात शुभम व मयूर गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमी शुभम व मयूरला तुमसर येथील शासकीय उपजला रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले शुभमची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला डॉक्टरांनी भंडारा येथे रेफर केले.

भंडारा येथे जाताना वाटेत शुभमचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर मयूर यालाही भंडारा येथे रेफर करण्यात सध्या त्याच्यावर भंडारा येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभम हा देव्हाडी येथील क्लेरिअन ड्रग कंपनीत कार्यरत होता. तीन वर्षांपूर्वी वडिलांच्या तर दोन वर्षांपूर्वी शुभमच्या लहान भावाचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. शुभम हा आईला एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाम्हनी गावात शुभमच्या मृत्यूची वार्ता कळताच गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Accidentअपघात