शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

आय एम सॉरी मम्मी... असा मेसेज पाठवित बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 17:13 IST

तुमसर तालुक्यातील घटना : आजीच्या घरी ओढणीने लावला गळफास

तुमसर (भंडारा) : आय एम सॉरी मम्मी... असा मेसेज आईला पाठवित बारावीच्या विद्यार्थिनीने आजीच्या घरी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तुमसर तालुक्यातील हसारा येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. वडिलांच्या निधनानंतर ती आपल्या आजीकडे शिक्षणासाठी राहत होती.

तनिष्का उर्फ निधी जितेंद्र पाटील (१८) रा. हसारा टोली. ता तुमसर असे मृत विद्यार्थ्यांनीचे नाव आहे. ती तुमसर येथील मातोश्री विद्या मंदिरात बारावी विज्ञान शाखेत शिकत होती. मूळ नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील तनिष्काच्या वडीलांचे निधन झाले होते. त्यामुळे ती हसारा येथे आपल्या आजीकडे शिक्षणासाठी राहत होती. बाराव्या वर्गाचे प्रात्यक्षिक पेपर सुरु आहेत.

रविवारी रात्री आपल्या मोबाईलवरून कामठी येथे राहत असलेल्या आईला आय एम साॅरी .. लव यू मम्मी..असा मेसेज फाॅरवर्ड करुन मध्यरात्रीच्या सुमारास पंख्याला ओढणीने गळफास लावून घेतला. सोमवारी सकाळी ७ वाजता मावशी व आजीने तनिष्का आतापर्यंत उठली का नाही. म्हणून तिच्या खोलीत खिडकीतून डोकावून बघितले. तेव्हा तनिष्का गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. मावशी व आजीने एकच हंबरडा फोडला.

घटनेची माहीती गावात होताच नागरीकांनी एकच गर्दी केली. तनिष्काच्या आत्महत्याचे कारण कळू शकले नाही. तिच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची नोंद तुमसर पोलिसांत करण्यात आली असून तपास ठाणेदार नितिन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कुंभरे करीत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीbhandara-acभंडारा