साकोली तालुक्यात ९४ गावांची धुरा ६६ पोलिसांवर

By Admin | Updated: December 18, 2014 22:48 IST2014-12-18T22:48:34+5:302014-12-18T22:48:34+5:30

पोलिसांच्या कार्यपध्दतीवर नेहमीच टीका होत असली तरी ते ज्या परिस्थितीत काम करतात त्यावर मात्र गांभीर्याने कधीच विचार केला जात नाही. साकोली येथे पोलिसांसाठी राहायला घरे नाहीत. तरीही हे कर्मचारी

94 villages of Sakoli taluka in Dhule 66 on police | साकोली तालुक्यात ९४ गावांची धुरा ६६ पोलिसांवर

साकोली तालुक्यात ९४ गावांची धुरा ६६ पोलिसांवर

संजय साठवणे - साकोली
पोलिसांच्या कार्यपध्दतीवर नेहमीच टीका होत असली तरी ते ज्या परिस्थितीत काम करतात त्यावर मात्र गांभीर्याने कधीच विचार केला जात नाही. साकोली येथे पोलिसांसाठी राहायला घरे नाहीत. तरीही हे कर्मचारी कर्तव्य बजावत आहे.
साकोली तालुका हा नक्षलग्रसत तालुका घोषित झाला आहे. शासन निर्णयानुसार या तालुक्यासाठी विशेष तरतुद असुन येथील कर्मचारी मुख्यालयी राहावे असे बंधनकारक आहे. शासनाने या तालुक्यासाठी विशेष निधीचीही तरतुद केली आहे. तरीही जनतेचे रक्षण करणाऱ्याला राहायला घरे नाहीत. ही शोकांतिका आहे.
बऱ्याच वर्षापुर्वी वर्मा ट्रॅक्टर दुकानाच्या बाजुला २० सदनिका व पोलिस ठाण्याच्या मागे ८ सदनिका पोलिसांसाठी तयार करण्यात आल्या होत्या मात्र देखभाल दुरुस्तीअभावी या सदनिका राहण्यायोग्य राहिल्या नाही. त्यामुळे पोलिस कर्मचारी भाड्याच्या घरात राहतात. त्यामुळे शासनावर हा बोझा बसत आहे. जर योग्यवेळी ही दुरुस्ती केली असती तर कदाचित हा खर्च वाचविता येऊ शकला असता.

Web Title: 94 villages of Sakoli taluka in Dhule 66 on police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.