शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपाने विक्रीतून मिळणार ९.२३ कोटी

By admin | Updated: July 20, 2015 00:33 IST

गोंदिया वन विभागातील संपूर्ण २९ तेंदूपानांच्या घटकांसाठी शासनाद्वारे परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आली होती.

दोन वर्षांचा बोनस बाकी : २०१२ व २०१३ मध्ये १४.७७ कोटी बोनस वाटपगोंदिया : गोंदिया वन विभागातील संपूर्ण २९ तेंदूपानांच्या घटकांसाठी शासनाद्वारे परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आली होती. तेंदूपानांच्या हंगामात तेंदूपाने संकलनाचे काम सुरळीतपणे पार पडले. या हंगामातील तेंदूपानांच्या घटक विक्रीपोटी शासनाला नऊ कोटी २३ लाख ३७ हजार ७८२ रूपयांचा महसूल प्राप्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सन २०१५ च्या हंगामात तेंदूपाने संकलनाचे काम गोंदिया विभागातील क्षेत्रीय कर्मचारी व परवानाधारक यांनी त्यांच्या स्तरावर उत्तम नियोजनातून पूर्ण केले. तेंदूपाने घटक विक्रीपासून मिळालेल्या महसुलातून शासकीय खर्च वजा करून शासनातर्फे मजुरांना शिल्लक रक्कम बोनस स्वरूपात वितरित करण्याचे धोरण आहे. सद्यस्थितीत गोंदिया वन विभागातील सन २०१२ हंगामातील मजुरांचे बोनस वितरणाचे काम जवळजवळ संपुष्टात आले आहे. तसेच सन २०१३ हंगामातील बोनस वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर सन २०१४ हंगामातील बोनस वाटपाला सुरूवात होणार आहे. तसेच अवघ्या सहा महिन्यांत बोनस वाटपाचे काम पूर्ण करण्याचा गोंदिया वन विभागाचा निर्धार असल्याचे समजते. सन २०१४ व सन २०१५ या दोन वर्षांचे बोनस वितरण होणे बाकी आहे. तर सन २०१२ हंगामातील ९९.३४ टक्के व सन २०१३ हंगामातील ९४.७२ टक्के मजुरांना बोनस वितरित करण्यात आले आहे. यातील काही मजुरांचा मृत्यू झाला असून तर काही मजुरांची बँकेत खाती नसल्यामुळे त्यांचा बोनस वाटप करणे बाकी असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येते. तेंदूपान संकलनाच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला काम उपलब्ध होत असून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटतो. मात्र यात त्यांच्या जिवितालाही धोका निर्माण होत असल्याचे प्रकार घडतात. यामुळे मजुरांनी प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत आपल्या नावे बँक खाते उघडावे व त्याबाबत माहिती परिक्षेत्र कार्यालयात द्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी) दोन वर्षांत ८७,९८६ मजुरांना बोनस वाटपसन २०१२ व २०१३ मधील ८७ हजार ९८६ मजुरांना १४ कोटी ७७ लाख ४० हजार ९२१ रूपयांचे बोनस वितरित करण्यात आले आहे. सन २०१२ मध्ये बोनससाठी पात्र मजूर संख्या ५० हजार १०७ होती. त्यांना १० कोटी ७३ लाख ५३ लाख ४५५ रूपयांचे बोनस द्यावयाचे होते. यापैकी ४९ हजार ९३६ मजुरांना १० कोटी ६६ लाख ४० हजार १११ रूपयांचे बोनस वाटप करण्यात आले असून त्यांची टक्केवारी ९९.३४ आहे. तर सन २०१३ मध्ये बोनससाठी पात्र मजूर संख्या ३९ हजार ०९० होती. त्यांना चार कोटी ३३ लाख ९१ हजार ५६१ रूपयांचे बोनस वाटप करावयाचे होते. यापैकी ३८ हजार ०५० मजुरांना चार कोटी ११ लाख ८१० रूपयांचे बोनस वाटप करण्यात आले असून याची टक्केवारी ९४.७२ एवढी आहे.आठ कोटींची मजुरी वाटपतेंदूपाने संकलन करणे, पुडे सुकविणे, पाणी शिंपणे, बोद भराई करणे आदी संपूर्ण कामांसाठी मजुरांना सुमारे आठ कोटी रूपये मजुरी परवानाधारकांमार्फत वितरित करण्यात आली आहे. त्यामुळे मजूरांच्या कुटुंबांना उन्हाळ्याच्या दिवसांत या मजुरीच्या माध्यमातून एक मोठा आर्थिक आधार प्राप्त झालेला आहे. या वर्षात गोंदिया वन विभागासाठी नेमून दिलेल्या उद्दिष्टांपैकी ९० टक्के तेंदूपानांचे संकलन झालेले आहे. गोंदिया वन विभागात एकूण ४० हजार ९३६ गोणी तेंदूपाने संकलन झालेली आहेत. तेंदूपाने संकलन कामामुळे मे महिन्यात सुमारे ४.५० लाख मजूर दिवस रोजगार निर्मिती झालेली असून सुमारे ५० हजार मजुरांना उन्हाळ्याच्या कालावधीत रोजगार प्राप्त झालेला आहे.