९६ गावांतील हजारों हेक्टर शेती सिंचनापासून वंचित
By Admin | Updated: August 14, 2015 00:02 IST2015-08-14T00:02:51+5:302015-08-14T00:02:51+5:30
इंग्रजकालीन तालुका म्हणून साकोलीची ओळख आहे. मात्र या तालुक्याचा जसा राजकीयदृष्ट्या विकास झाला तसा विकासाच्या बाबतीत झाला नाही.

९६ गावांतील हजारों हेक्टर शेती सिंचनापासून वंचित
संजय साठवणे साकोली
इंग्रजकालीन तालुका म्हणून साकोलीची ओळख आहे. मात्र या तालुक्याचा जसा राजकीयदृष्ट्या विकास झाला तसा विकासाच्या बाबतीत झाला नाही. जिल्ह्यातील सर्वात जुना तालुका असला तरीही या तालुक्यातील सिंचनाची अवस्था फार गंभीर आहे. त्यामुळे तालुुक्यातील लोकप्रतिनिधी खरेच जनतेच्या हितासाठी काम करतात काय? असा प्रश्न ९६ गावातील अपुरी सिंचन व्यवस्था पाहिल्यावर लक्षात येईल.
मागील २० वर्षापासून कुंभली येथील निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरु आहे. या प्रकल्पाचे काम अजूनही बाकी आहे. ते तर निम्न या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमीनी गेल्या त्या शेतकऱ्यांना आजही शेतीचा मोबदला मिळाला नाही. भुरेजंगी प्रकल्पाला वनकायद्याचे ग्रहण तर भीमलकसा प्रकल्पाला जसेतसे अंतिम मान्यता मिळाली. त्याला पूर्णत्वास जाईपर्यंत किती दिवस लागतात ही येणारी वेळ सांगू शकतो.
साकोली तालुक्यातील ९६ गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी निसर्गावरच अवलंबून राहावे लागते किंवा पंपाच्या आधारे शेती करावी लागते. तालुक्यातून चुलबंद नदी वाहते. मात्र तिचाही सिंचनासाठी उपयोग होत नाही.
पावसाळ्यात भरपूर पाऊस येत असला तरी तालुक्यातील माजी मालगुजारी तलावात पाणी साठविण्याची योजनाच नाही. एकेकाळी हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करणारे मालगुजारी तलाव शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे निरुपयोगी ठरत असल्याने शेतकरी संकटात आहे.