९४० किलो मोहफुलाचा सडवा पकडला

By Admin | Updated: October 19, 2016 00:51 IST2016-10-19T00:38:43+5:302016-10-19T00:51:51+5:30

तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बपेरा, देवसर्रा, सोंड्या, दावेझरी परिसरात अवैधरित्या मोहफुलांची हातभट्टी दारू गाळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर...

9 40 kg trapped Mohphula | ९४० किलो मोहफुलाचा सडवा पकडला

९४० किलो मोहफुलाचा सडवा पकडला

पोलिसांची कारवाई : सिहोरा परिसरात अवैध दारु अड्ड्यावर धाडी
तुमसर : तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बपेरा, देवसर्रा, सोंड्या, दावेझरी परिसरात अवैधरित्या मोहफुलांची हातभट्टी दारू गाळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाडसत्र राबवून मोहफुलासह दारू जप्त केली. यात आरोपींच्या ताब्यातून ९४० किलो मोहफुलाचा सडवा, ६७ लिटर हातभट्टी दारू गाळण्याचे साहित्य असा ५,४२० रूपयांचा माल जप्त करण्यात आला.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्त्वात पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकातील विजय डोंगरे, जयसिंग लिल्हारे, भूषण मेश्राम, प्रदीप बागडे, नामदेव बळदे, ईश्वर चौधरी, सुधीर धमगाये, विनोद आरीकर, विनोद उपरकर यांनी केली. यावेळी बपेरा, देवसरा, सोंड्या याठिकाणी धाड घालून दारू गाळणाऱ्या चार लोकांविरूद्ध व विक्री करणाऱ्या चार जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपींच्या ताब्यातून ९४० किलो मोहफुलाचा सडवा, ६७ लिटर हातभट्टी दारू गाळण्याचे साहित्य असा ५,४२० रूपयांचा माल जप्त करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक घूसर हे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

सिहोरा परिसरात कोंबडा बाजारावर धाड
तुमसर : तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या मोहाडी, खापा, थेरकरटोली येथे बाजुचे जंगलात काही ईसम हे कोंबड्याची झुंज लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी धाड घालून जैराम थेरकर, भूषण थेरकर, जितेंद्र थेरकर, प्रभाकर सोरते, देवानंद पाटील, अर्जुन भलावे, सुखचंद कटरे या सात आरोपींना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून आरोपीकडून काती लावून असलेले तीन जखमी कोंबडे जप्त करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक जायले हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 9 40 kg trapped Mohphula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.