८८.५ मि.मी. अवकाळी पाऊस
By Admin | Updated: March 19, 2015 00:36 IST2015-03-19T00:36:54+5:302015-03-19T00:36:54+5:30
जिल्ह्यात यावर्षी अवकाळी पाऊस वारंवार हजेरी लावत आहे. २ जानेवारी ते १७ मार्च २०१५ या अडीच महिन्यांच्या ...

८८.५ मि.मी. अवकाळी पाऊस
भंडारा : जिल्ह्यात यावर्षी अवकाळी पाऊस वारंवार हजेरी लावत आहे. २ जानेवारी ते १७ मार्च २०१५ या अडीच महिन्यांच्या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाची सरासरी ८८.५ मि.मी. आहे. जानेवारी महिन्यापासून अवकाळी पावसाचे झालेले आगमन आजतागायत कायम आहे. जिल्ह्यात भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली, लाखांदूर व लाखनी या तालुक्यात २ जानेवारीला १७.७ मि.मी., ३ जानेवारीला ६५.७ मि.मी., ४ जानेवारीला ०.३ मि.मी. तर ११ फेब्रुवारीला १७.५, १ मार्च रोजी १८.५, २ मार्च रोजी ४६५ मि.मी., ३ मार्चला ०.१ मि.मी., ४ मार्चला १.० तर १६ मार्चला २४.८ मि.मी. व १७ मार्चला ३६.५ मि.मी. पाऊस पडला आहे. यावर्षी खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळाची व नापिकीची स्थिती असताना शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामावर लागून होत्या. (नगर प्रतिनिधी)