देवरी तलावासाठी ८७ लाखांचा निधी
By Admin | Updated: May 10, 2017 00:35 IST2017-05-10T00:35:16+5:302017-05-10T00:35:16+5:30
बहुप्रतिक्षित देवरी/ गोंदिच्या १०० हेक्टर तलावाला जलयुक्त शिवार योजनेत सामावून ८७ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.

देवरी तलावासाठी ८७ लाखांचा निधी
१२ वर्र्षांची प्रतीक्षा फळाला
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : बहुप्रतिक्षित देवरी/ गोंदिच्या १०० हेक्टर तलावाला जलयुक्त शिवार योजनेत सामावून ८७ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. भूमिपूजनाचा सोहळा गावकऱ्यांच्या साक्षीने व लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने पार पडला. यावेळी आमदार बाळा काशिवार , जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, सभापती विनायक बुरडे, पंचायत समितीच्या सभापती रजनी आत्राम, उपसभापती विजय कापसे, पंचायत समिती सदस्य वंदना गवळे, भाजपचे तालुकाध्यक्ष पद्माकर बावनकर जिल्हा महामंत्री भरत खंडाईत, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, तहसिलदार राजीव शक्करवार, सरपंच धनंजय घाटबांधे, लिलाधर चेटूले, मंगेश येवले, नितीन रणदिवे, प्रमोद हटवार, रामदास प्रधान, जे. बी. इखार, एस. एम. गडकरी आदी उपस्थित होते.
आमदार काशिवार म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेची व्याप्ती व महत्ती दुरदृष्टीतून बनविली आहे. निसर्गाचे ७० टक्के पाणी वाहून न जाता अधिकाधिक भूगर्भात मुरावे शेततळे विहिरी बोअरवेल यांना मुबलक पाणी मिळून विहिरी, बोअरवेल यांना मुबलक पाणी मिळून मानवी जीवन सुखी व्हावी याकरिता जलयुक्त शिवार योजना कार्यान्वित करण्यात आली.
९५ लक्ष रुपयांची गरज असतांना ८७ लक्ष रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. उर्वरित निधी विशेष बाब समजून उभी करण्यात येईल. खा. नाना पटोले यांच्या सहकार्याने तलावाची महत्ती पुढे नेल्याचे सांगितले. सरपंच समिता शेंडे यांनी कामाचा दर्जा उत्कृष्ट व्हावा, भ्रष्टाचाराला वाव मिळू नये, पावसाळ्यापुर्वी अपेक्षित काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
१०० हेक्टरच्या तलावात कायमस्वरुपी ३ फूट पाणी साठा राहणार आहे. ढिवर समाजबांधवाना यातून रोजगार मिळू शकतो. शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होईल. तेनुसार मिळणार आहे.
प्रास्ताविक रामदास प्रधान गुरुजी तर आभार दिनेश पागोटे यांनी सांभाळले. यावेळी मोरेश्वर खंडाईत, रत्नाकर नागलवाडे, देवरी गाववासी यांनी सहकार्य केले.