८७ पाणवठ्यांवर आज होणार प्राणी गणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2017 00:28 IST2017-05-10T00:28:53+5:302017-05-10T00:28:53+5:30

नागझिरा अभयारण्यात बुद्धपौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात बुधवारी सकाळपासून गुरुवार सकाळपर्यंत २४ तास वन्यप्राण्यांची गणना होणार आहे.

87 Calculations of creatures going on today in the water bodies | ८७ पाणवठ्यांवर आज होणार प्राणी गणना

८७ पाणवठ्यांवर आज होणार प्राणी गणना

१३१ मचाणीवर तयारी पूर्ण : न्यु नागझिरा, नवेगाव, कोका राखीव वनक्षेत्र सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी/पवनी/साकोली/आमगाव : नागझिरा अभयारण्यात बुद्धपौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात बुधवारी सकाळपासून गुरुवार सकाळपर्यंत २४ तास वन्यप्राण्यांची गणना होणार आहे. प्राणी गणनेचा आनंद घेण्यासाठी वन्यजीवप्रेमी उत्सूक आहेत. जिल्ह्यात ८७ पाणवठ्यावर १३१ मचाणीवरून वन्यप्राण्यांची गणना होणार आहे.
नागझिरा अभयारण्य, न्यू नागझिरा अभयारण्य व नवेगाव राष्ट्रीय उद्यान व नवेगाव व्याघ्रप्रकल्प व कोका वन्यजीव अभयारण्य क्षेत्रात वन्यप्राणी गणना करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. वर्षभरात सर्वात अधिक प्रकाशमान असणाऱ्या बुद्धपौर्णिमेच्या रात्री अभयारण्यातील प्रत्येक पानवठ्यावर अशा १३१ मचाणी उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक ५० मीटरवर एक मचाण आहे. पर्यटनप्रेमी व वनविभागाचे कर्मचारी तसेच सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते प्रणगनेत सहभागी होणार आहेत. १० मे च्या सकाळी ७ वाजतापासून ११ मे च्या सकाळी ७ वाजेपर्यंत गणना चालेल. उमरझरी १२, नागझिरा ३५, पिटेझरी २१, कोका १६, नवेगाव ३७ मचाणींचा समावेश आहे. प्रगणनेच्या वेळी पर्यटकांसाठी प्रवेशद्वार बंद राहणार आहे. एका मचाणीवर वनविभागाचे एक प्रतिनिधी व स्वयंसेवी अशा दोन व्यक्तींकडून गणना केली जाईल. प्राणी गणनेत सहभागी होण्यासाठी शुल्क आकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्राणीगणनेत महिलांचाही सहभाग राहणार आहे. चंद्रप्रकाशात प्राणीगणना केली जाणार आहे.
अभयारण्यामध्ये वन्यप्राण्यांच्या प्रजाती व संख्या किती याची माहिती मिळणार. वन्यप्राण्यांची संख्या कमी होत आहे. त्या प्रजाती टिकवून ठेवण्यासाठी वनविभाग विविध उपाययोजना करीत आहे. त्या प्रजाती टिकवून ठेवण्यासाठी वनविभाग विविध उपाययोजना करीत आहे. त्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. कोणत्या प्रकारचे किती प्राणी आहेत यासाठी पाणवठ्याजवळ जंगलामध्ये मचाण बांधणी करण्यात आली आहे. या मचाणीवर रात्रभर राहून निसर्गप्रेमी प्राण्यांची प्रगणना करणार आहेत. यानिमित्ताने निसर्गाचा आनंद उपभोगता येणार आहे.

वन्यजीवांच्या मोजणीचे वेळापत्रक
मचाणीवरुन सकाळी ८ वाजतापासून ते ११ मेच्या सकाळी १० वाजेपर्यंत मचाणाजवळ असलेल्या जलस्त्रोतांवर येणाऱ्या वन्यप्राण्यांची गणना करणार आहे. यासाठी १३१ जलसाठ्यांची निवड केली गेली आहे. जलस्त्रोतांपासून ५० मीटर अंतरावर हे मचाण तयार करण्यात आले आहेत.
या ठिकाणी होणार प्राणी गणना
यात उमरझरी नैसर्गिक १, कृत्रीम १०, नागझिऱ्यात नैसर्गिक ५, कृत्रीम ३०, पिटेझरी येथे नैसर्गिक १, कृत्रीम २०, कोका अभयारण्यात नैसर्गिक ८ व कृत्रीम ८, नवेगाव उद्यानात नैसर्गिक १५, कृत्रिम ३२ ठिकाणी मोजणी होईल.
सुरक्षेसाठी विशेष खबरदारी
नवेगाव उद्यानात वनविभागाचे कर्मचारी सहभागी होवू शकणार आहेत. मागील काही दिवसात शेजारील छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करुन यावर्षी वन्यप्राणीप्रेमींना प्रवेश दिला जाणार नाही. न्यु नागझिरा व कोका अभयारण्यात सुरक्षीत जंगलक्षेत्रातच प्रवेश दिला जाणार आहे.
निशुल्क व्यवस्था, ३४१ अर्ज प्राप्त
मोजणीसाठी सर्व सामाजिक संस्था व वन्यप्राणी प्रेमींनी सकाळी ७ वाजता संबंधित ठिकाणी जमा व्हावे लागेल. येथून वनविभागाच्यावतीने त्यांना मचाणीपर्यंत पोहचविण्याची नि:शुल्क सोय करण्यात येणार आहे. प्राणी गणनेसाठी आॅनलाईन अर्जात देशातील विविध क्षेत्रातील व जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचे वन्यजीव प्रेमींचे ३४१ अर्ज प्राप्त झाले आहेत.

Web Title: 87 Calculations of creatures going on today in the water bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.