लाखांदूर तालुक्यात ८६ बालके कुपोषित

By Admin | Updated: February 13, 2015 00:58 IST2015-02-13T00:58:20+5:302015-02-13T00:58:20+5:30

० ते ६ वर्षे वयोगटातील बालक कुपोषीत राहू नये यासाठी शासन कटीबद्ध असताना आरोग्य विभाग व एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या ....

86 children malnourished in Lakhandur taluka | लाखांदूर तालुक्यात ८६ बालके कुपोषित

लाखांदूर तालुक्यात ८६ बालके कुपोषित

लाखांदूर : ० ते ६ वर्षे वयोगटातील बालक कुपोषीत राहू नये यासाठी शासन कटीबद्ध असताना आरोग्य विभाग व एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अकार्यक्षम धोरणामुळे लाखांदूर तालुक्यात तब्बल ८६ बालके कुपोषीत असल्याची खळबळजनक माहिती आहे.
लाखांदूर तालुक्यात १६० अंगणवाडी केंद्र आहेत. त्यामध्ये १४२ अंगणवाडी तर १८ मिनी अंगणवाडीचा समावेश आहे. एकूण १६० अंगणवाडी केंद्रांतर्गत तब्बल १० हजार ६५५ बालके लाभार्थी आहेत. त्यानुसार ९ हजार ७६५ लाभार्थी बालके साधारण असून उर्वरित बालके श्रेणीनिहाय कुपोषित असल्याची माहिती आहे. मध्यम श्रेणीनुसार ५५६ बालकांचा समावेश आहे. वजनानुसार एकूण ८६ बालके कुपोषित असून उंचीनुसार अति तीव्र १० तर मध्यम तीव्र ३५ बालके असल्याची माहिती आहे. दरम्यान शासन दरवर्षी ग्राम बाल विकास केंद्रांतर्गत खेड्या पाड्यातील बालके कुपोषणमुक्त करण्याहेतू कोट्यवधीचा निधी खर्च करीत असताना अद्यापही लाखांदूर तालुका कुपोषणमुक्त न ठरल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
नियमित सकस आहाराचा पुरवठा होत नसल्यानेच तालुक्यात कुपोषित बालके असल्याचा आरोप होताना आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे अनेकांनी सांगितले. याप्ररकणी शासनाने तात्काळ दखल दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जनतेने केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 86 children malnourished in Lakhandur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.