परसोडीच्या तान्हा पोळ्यात ८२२ नंदीबैलांची हजेरी

By Admin | Updated: September 4, 2016 00:33 IST2016-09-04T00:33:05+5:302016-09-04T00:33:05+5:30

मागील ३७ वर्षापासून परसोडी येथील हनुमान मंदिरासमोर मखराचा तान्हा तान्हा पोळा उत्साहात पार पडला.

822 Nandabali attendance in Tanas Pansodi | परसोडीच्या तान्हा पोळ्यात ८२२ नंदीबैलांची हजेरी

परसोडीच्या तान्हा पोळ्यात ८२२ नंदीबैलांची हजेरी

३७ वर्षाची परंपरा कायम : विदेशी पर्यटकाकडून वह्या नोटबुकाचे वितरण
जवाहरनगर : मागील ३७ वर्षापासून परसोडी येथील हनुमान मंदिरासमोर मखराचा तान्हा तान्हा पोळा उत्साहात पार पडला. यावेळी महिलांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विदेशी पर्यटकाकडून बक्षीस वितरण करण्यात आले.
परसोडी येथील घरोघरी बालगोपाल पालकांसोबत नंदी बैल सजावटीत व्यस्त होते. पाडव्याच्या दिवशी पहाटेपासून या परिसरात रिमझिम पाऊस होता. पावसाने विश्रांती दिल्यानंतर बालगोपाल आनंदी झाले. यावेळी हनुमान मंदीर परिसरात ८२२ लाकडी नंदीबैलांनी हजेरी लावली. मंचावरून तान्हा पोळ्याच्या झडती सुरू होत्या. यात दादाराव वंजारी, किसना वंजारी, भाऊराव वंजारी, राजकपूर राऊत, मोतीलाल येळणे यांच्यात झडतीची स्पर्धा लागल्याची प्रचिती येत होती.
यावेळी आमदार रामचंद्र अवसरे यांच्या अध्यक्षतेखाली नंदीबैल सजावट स्पर्धाचे निरीक्षण करण्यात आले. नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, माजी सभापती टेकचंद सावरकर, पोळा पंच कमेटीचे अध्यक्ष मारोतराव हटवार माजी सभापती राजकपूर राऊत, माजी सभापती कल्पना मोटघरे, पंकज सुखदेवे, दर्शन फंदे, होमदेव चकोले, जिजा बावनकुळे, श्यामकला चकोले, कौशल्या हटवार, कुंदा हटवार, प्रमिला हटवार, प्रमिला फंदे, छाया हटवार, विजया वंजारी, पुष्पा बांते, मंजुळा वंजारी उपस्थित होते. पाहुण्याच्या हस्ते वॉटर फिल्टर, गोदरेज आलमारी, सायकल, टेबल फॅन असे २५ पारितोषिक बालगोपालांना देण्यात आले.
यात शिवाजी वॉर्ड परसोडी, अनुप अटारकर, नितीन हटवार, अरणव सुरजाडे गडचिरोली, जान्हवी वंजारी, येदिका साखरवाडे, हितांशु मालाधरे, रूबल मोटघरे, सुरेश वंजारी, अरन्य हटवार, साहिल हटवार, साहिल साखरवाडे, श्रावणी हटवार, प्राजल वंजारी, प्रदीप गजभिये, दक्ष कांबळे, टिकेट चकोले, रोहित हटवार, सारंग दादुरवाडे, आर्या फंदे, आकाश वंजारी, टिकेश हटवार, आदेश कांबळे, निलेश हटवार, प्रेम हटवार, साहिल गैर यांचा व उपस्थित सर्व बाल कास्तकारांना पोळा पंच कमेटीतर्फे प्रोत्साहनपर ट्रे भेट म्हणून देण्यात आले. तत्पुर्वी दुपारी आम कुस्त्याचे दंगल आयोजित करण्यात आले होते. नामांकित कुस्तिगीरांना मोठ्या संख्येने हजेरी लावली. सकाळपासून महिला तरूणीनी आकाश झोपाळाचा आस्वाद घेतला. याप्रसंगी महिलाचे विविध स्पर्धा घेण्यात आले. विजयी स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. यात चमचा गोळी स्पर्धेत जानवी मोटघरे, स्मृती हटवार, सपना हटवार, समा हटवार, बटाटा रेस स्पर्धेत अर्चना हटवार, मंदा हटवार, भूमिका हटवार, पुष्पा कुंडले, पपीता गजभिये, प्रौढ महिला कबड्डी स्पर्धेत बारू दादुरवाडे, कमला वंजारी, रेणुका साखरवाडे, सत्यभामा शहारे, वच्छला समरीत, तरूण मुलीमध्ये उर्मिला चकोले, मंदा हटवार, अर्चना हटवार, सपना हटवार, गीता हटवार, भूमिका हटवार, शालिनी वंजारी, पाण्याचा घागर दौड स्पर्धेत भारती वंजारी, शालु वंजारी, सुनिता साखरवाडे, दुर्गा निरगुळकर, मंदा हटवार, छाया हटवार, प्रमिला फंदे, पगबाधा दौड स्पर्धेत सुनिता निरगुळकर, माधुरी हटवार, भूमिका हटवार यांचा समावेश होता. प्रास्ताविक मारोतराव हटवार यांनी केले. संचालन मोतीलाल येळणे यांनी तर आभार राजकपूर राऊत यांनी मानले.
कार्यक्रमासाठी पोळा पंचकमेटी, ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य, तंटामुक्त गाव समिती पदाधिकारी सदस्य, ठणठण पार्टी परसोडी तेली पंचकमेटी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: 822 Nandabali attendance in Tanas Pansodi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.