८९१ ज्योतिकलशांची स्थापना
By Admin | Updated: April 11, 2016 00:33 IST2016-04-11T00:33:04+5:302016-04-11T00:33:04+5:30
अड्याळ येथील प्रसिद्ध हनुमंत मंदिरात चैत्र नवरात्रनिमित्त ८९१ मनोकामनापूर्ती ज्योती कलशांची स्थापना करण्यात आली आहे. ...

८९१ ज्योतिकलशांची स्थापना
अड्याळ येथील यात्रेला प्रारंभ : सर्वधर्मसमभावाची शिकवण
विशाल रणदिवे अड्याळ
अड्याळ येथील प्रसिद्ध हनुमंत मंदिरात चैत्र नवरात्रनिमित्त ८९१ मनोकामनापूर्ती ज्योती कलशांची स्थापना करण्यात आली आहे. या दर्शनासाठी व मंगलमय संगीतमय सुंदरकांड ऐकण्यासाठी सकाळ संध्याकाळी भाविकांची गर्दी होत आहे. श्रीरामनवमीपर्यंत देवीचे पूजन आणि नवरात्रीच्या व्रताचे विशेष महत्व असल्याने या मंदिरात गावातील व बाहेरील भक्तांचे आवागमन सुरुच असते.
चैत्र नवरात्र हे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ते रामनवमी व नंतर हनुमानजयंती पर्यंत अड्याळ येथे घोडायात्रा भरत असते. सर्व लोक या दिवसात चैत्र नवरात्र साजरा करतात. पार्वती मातेचा जन्म चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला झाला म्हणून या दिवशी नवरात्री साजरी केली जाते.
दरवर्डी घोडायात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सतत या पंधरवाड्यात गर्दी असते. यामुळे बाहेर मार्गावर होणाऱ्या जड वाहतुकीकडे येथील ग्रामपंचायतीचे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण या जड वाहनामुळे कित्येकदा भर चौकात मंदिरासमोरच वाहतूक कोंडी होते. यामुळेच मंगलकार्यात येणाऱ्या भाविकांना सुद्धा हा सततचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथील पोलीस प्रशासन, ग्रामपंचायतीचे यावर त्वरीत उपाययोजना करणे महत्वाचे आहे.
घरात घटपूजन केल्याने वास्तूदोष, आध्यात्मिक माहिती छत्तीसगड राज्यातील कोरबा येथील आचार्य विरेंद्र पाण्डेय महाराज यांनी दिली.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा घट विसर्जन तीन कि.मी. अंतरावर चकारा येथील महादेव देवस्थानच्या पायथ्याशी असणाऱ्या भव्य जलाशयात होणार आहे .यावेळी विशेष आकर्षण म्हणून नवरात्रातील नऊ रुपे दाखविण्यात येणार आहे. विसर्जनस्थळावर विद्युतची व दूरवरून पायी डोक्यावर कलश आणणाऱ्या व सोबत येणाऱ्या भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची, महाप्रसादाची सोय करण्यात येणार असल्याची माहिती हनुमंत देवस्थानचे अध्यक्ष भाष्करराव पोटवार यांनी दिली.