आपातग्रस्त सिंदपुरीसाठी ८० लाख मंजूर
By Admin | Updated: June 11, 2017 00:18 IST2017-06-11T00:18:45+5:302017-06-11T00:18:45+5:30
तुमसर - बपेरा राज्य मार्गावरील आपातग्रस्त सिंदपुरी गावातील समस्या आणि अडचणी निकाली काढण्यासाठी ८० लाख रुपयांचे पॅकेज मंजूर करण्यात आले आहे.

आपातग्रस्त सिंदपुरीसाठी ८० लाख मंजूर
तलावाच्या जीर्ण पाळीची दुरुस्ती : पुलाचे बांधकामासाठी १५ लाख
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर - बपेरा राज्य मार्गावरील आपातग्रस्त सिंदपुरी गावातील समस्या आणि अडचणी निकाली काढण्यासाठी ८० लाख रुपयांचे पॅकेज मंजूर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्या प्रतीक्षा कटरे यांच्या प्रयत्नांना यात यश आले असून विकास कामांना सुरुवात झाली आहे.
तुमसर - बपेरा राज्य मार्गावरील अडीच हजार लोकवस्ती असलेल्या सिंदपुरी गावात मालगुजारी तलावाची पाळ फुटल्याने प्रचंड नासाडी झाली होती. १०० हेक्टर आर जागेपेक्षा अधिक असणाऱ्या या तलावाची जबाबदारी स्वीकारल्यापासून सुरुवातीला दोन विभागात बिनसले होते. तलाव दुरुस्तीची ओरड सुरु असताना निधीसाठी मंत्रालयात प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु या प्रस्तांना मंजुरी लांबणीवर गेली. दरम्यान पावसाळा तोंडावर असताना गावकऱ्यांचा स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेवर वाढता दबाव निर्माण झाला. गावकऱ्यांची समस्या आणि अडचण गंभीर असून न्यायसंगत असल्याने जिल्हा परिषद सदस्या प्रतीक्षा कटरे यांनी निधी मंजुरीकरिता प्रयत्न सुरु केले. अधिकारासाठी हक्काचे भांडण दूर ठेवून गावकऱ्यांची समस्या निकाली काढणे महत्वाचे असल्याने त्यांनी ठणकावले. जिल्हा परिषदेच्या बैठकीत गावकऱ्यांचा विषय त्यांनी चर्चेत ठेवले. यात समस्या गंभीर असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हा परिषद अंतर्गत तलावाच्या जीर्ण पाळ दुरुस्ती करिता ६७ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तलावाची पाळ फुटल्याने गावात रहदारीचा प्रश्न निर्माण झाला होता. दिवसरात्र गावात विसर्ग झालेल्या पाण्यााने तळ घोकल्याने नाल्या वाहून गेल्या होत्या. गावातील कुटुंब बोरकर यांचे घराशेजारी मार्गावरील पुल बांधकामासाठी १५ लाख रुपये खेचून आणण्यात यश आले आहे. गाव व तलाव विकसासाठी ८० लाख रुपयाना पॅकेज उपलब्ध करण्यात आला आहे. याच गावात तलावाची पाळ फुटल्यानंतर अनेक घरांची पडझड झाली होती. तर यात अनेकांची घरे कोसळली होती. या आपादग्रस्त नागरिकांना टिनाचे शेड वास्तव्यासाठी देण्यात आले होते. ही टिनाचे शेड जीर्ण झाल्याने आपादग्रस्तांनी घरकुल देण्याची ओरड सुरु केली. ही समस्या निकाली काढण्यासाठी गावातील ४८ आपादग्रस्तांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. उर्वरीत घरकुलधारकांची समस्या निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. परिसरात आदर्श गावाची शिकवण देणारे सिंदपुरी पहिलेच गाव आहे. या गावातअसणाऱ्या समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.
सिंदपुरी गावाच्या विकासाकरिता ८० लाखांचा निधी मंजूर केला असून उर्वरीत समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. गावकऱ्यांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न आहे.
-प्रतीक्षा कटरे, सदस्य, जि.प. चुल्हाड.