धानाचे आठ कोटी थकीत
By Admin | Updated: August 4, 2015 00:22 IST2015-08-04T00:22:39+5:302015-08-04T00:22:39+5:30
धान आधारभूत केंद्राने शेतकऱ्यांच्या धान्याची खरेदी केली. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही त्यांच्या धान्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही

धानाचे आठ कोटी थकीत
लाखांदूर : धान आधारभूत केंद्राने शेतकऱ्यांच्या धान्याची खरेदी केली. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही त्यांच्या धान्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. धान केंद्राकडून तालुक्यातील शेतकऱ्यांचे तब्बल ८ कोटीचे चुकारे अडल्याने खरीप हंगामात शेतकऱ्याला खासगी सावकाराच्या दारात उभे राहण्याचा प्रसंग ओढवला आहे.
धान उत्पादनात अग्रेसर लाखांदूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे शासनाकडे जवळपास ४ कोटी रुपये थकीत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या बोनसनुसार २ कोटी असे ८ कोटी रुपये थकीत असल्याचे शेतकरी पुरता आर्थिक व्यवहारात अडकला आहे. तालुक्यात रब्बी हंगामातील उन्हाळी धान उत्पादकांनी जवळपास ४९ हजार क्विंटल धानाची शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केली. यासाठी वित्तीय संस्थांना धान खरेदीचे शासनस्तरावर अधिकारही देण्यात आले होते. ‘ब’ प्रतीच्या धानविक्री दाखल धान खरेदीनुसार जवळपास शासनाचे ४९ हजार क्विंटल धान खरेदी केली. यात विजयलक्ष्मी राईस मिल लाखांदूर, पंचशील राईस मिल मासळ, खरेदी विक्री सहकारी संस्था लाखांदूर यांनी अनेक गावात धान खरेदी केंद्र सुरु केले होते.
सदर धानाची खरेदी दिघोरी, बारव्हा, लाखांदूर व पुयार, मासळ येथील केंद्रातून करण्यात आली. दरम्यान या केंद्रांतर्गत खरेदी पूर्ण धानाचे चुकारे खरीप हंगामाला सुरुवात होऊन दोन महिने लोटल्यानंतरही अद्याप चुकारे देण्यात आले नाही. शेतकऱ्यांनी भंडारा जिल्हा परिषद सदस्य रमेश डोंगरे यांचेकडे तक्रार केली. याची दखल घेत डोंगरे यांनी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत धानाचे चुकारे का मिळत नाही म्हणून जाब विचारला व आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला. या प्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेवून दोषीवर कारवाईची मागणी केली.
रब्बी धानाचे चुकारे नाही. यावर खरीप हंगामाला सुरुवात यामुळे पिक कर्ज घेवून शेती करणारा या भागातील शेतकरी पर्याप्त हमी भावाअभावी नागवला जात असताना शासनाला विकलेल्या मालाचे चुकारे निर्धारित वेळेत प्राप्त होत नसल्याने या भागातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. धानाचे चुकारे नाही. तरीपण शेतकऱ्यांनी पीक कर्ज व सेवा सहकारी संस्थामधून जुने कर्ज परतफेड करून नवीन खरीप हंगामासाठी खासगी सावकाराचा दरवाजा ठोठावला आहे. व्याजाची रक्कम तथा न शेतकरी परंपरागत व्यवसाय करण्यासाठी धडपडताना दिसत आहे.
यंदा अपुऱ्या पावसामुळे दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे गेलेला शेतकरी मर्यादा संपल्यानंतरही कृत्रीम पाण्याने खरीप हंगामाची शेती करण्यालाही धडपडत घेताना दिसत आहे. हमी भाव तर सोळा, बोनस मिळणार नसून उशीरा का होईना दररोज आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाच्या चुकाऱ्यालाही पायपीट करावी लागत असल्याने आंदोलन करण्याचा इशाराही अनेक शेतकऱ्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
लाखांदूर तालुक्याची ३५ लाख रूपयांची लिमिट पूर्ण वाटप करण्यात आली. मात्र लाख रूपयांचे चुकाने अडून आहेत. शेतकऱ्यांची दररोज ओरड असते. याप्रकरणी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना विचारले तर लवकरच चुकारे देण्यात येईल, असे सांगतात. मात्र चुकारे न दिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
- आशिष बुरडे, व्यवस्थापक, विजया लक्ष्मी राईस मिल, लाखांदूर.