शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

साकोलीत पावणेआठ लाखांची धाडसी चोरी, रोख रकमेसह ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 14:49 IST

एकापेक्षा जास्त चोरट्यांचा समावेश

इंद्रपाल कटकवार

भंडारा : जिल्ह्यात चोरीच्या घटना सातत्याने वाढत असताना साकोली शहरात चोरट्यांनी पुन्हा एका घरात धाडसी चोरी केली आहे. यात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या ऐवजासह रोख रक्कम चोरून नेली. तब्बल सात लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. धर्मेंद्र सत्यनारायण अग्रवाल (४६)रा. नर्सरी कॉलनी साकोली यांच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. ही घटना गुरुवारला उघडकीस आली.

माहितीनुसार, धर्मेंद्र अग्रवाल हे कुटुंबीयांसह कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. यावेळी घरासमोरील दाराला कुलूप लावले होते. चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधून अग्रवाल यांच्या घरासमोरील प्रवेशद्वाराचा कुलूप फोडला. आत प्रवेश केला. लोखंडी अलमारातील सोन्याचे गोप तीन नग, एक डायमंड सेट व रोख ७० हजार रुपये सह सोन्याच्या अंगठ्या बांगड्या व टॉप्स असा एकूण सात लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

अग्रवाल यांच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध ४५४, ४५७, ३८० कलमांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय खोकले करीत आहेत. शहरात चोरीच्या घटना सातत्याने वाढत असल्याचेही दिसून येत आहे. चोरीच्या या घटनेत एकापेक्षा जास्त चोरटे सहभागी झाले असावेत असा पोलिसांचा कयास आहे. त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. दरम्यान धाडसी घरफोडीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhandara-acभंडारा