शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मुरुम खननप्रकरणी ठोठावला ८ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:42 AM

मौजा साकोली येथील गट नंबर २५२ मधील आराजी ०.९३ हे आर जागेच्या अकृषक लेआऊटमध्ये अवैधरित्या १५० ब्रास मुरुम टाकून पसरविल्याबद्दल सुमीत लंजे व इतर १० जणांविरुध्द ८ लक्ष १० हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.

ठळक मुद्देतहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई

आॅनलाईन लोकमतसाकोली : मौजा साकोली येथील गट नंबर २५२ मधील आराजी ०.९३ हे आर जागेच्या अकृषक लेआऊटमध्ये अवैधरित्या १५० ब्रास मुरुम टाकून पसरविल्याबद्दल सुमीत लंजे व इतर १० जणांविरुध्द ८ लक्ष १० हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. ही कार्यवाही उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे व तहसिलदार अरविंद हिंगे यांनी केली आहे.सदर प्रकरणात सुमित लंजे व इतर १० जणांनी अवैधरित्या मुरुमाचे अवैध उत्खनन करुन गडकुंभली रोडवरील लेआऊटमध्ये १५० ब्रास मुरुम टाकून त्याला पसरविले. याप्रकरणी रॉयल्टीचे ६० हजार रुपये व दंड म्हणून ७ लक्ष ५० हजार रुपये असे एकुण ८ लाख १० हजार रुपयांची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.यात वापरण्यात आलेली जेसीबी व ट्रॅक्टरवर कार्यवाही करुन सोडण्यात आले आहे. सदर कार्यवाही ही ३ तारखेला करण्यात आली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजांची अवैधरित्या वाहतूक होत असते. याकडे कधीकधी दुर्लक्षही होते.जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारया तक्रारीप्रमाणे तलाठी यांनी ३ ला दुपारी अंदाजे ३ वाजताचे सुमारास तहसीलदार व तलाठी यांनी मुरुम पसरवित असलेल्या जेसीबीचा पंचनामा करुन कार्यवाही केली व जेसीबी तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले. मात्र जेसीबी तहसील कार्यालयात जमा करण्यात आली नाही. दुसºया दिवशी हा टाकलेला मुरुम एका ट्रॅक्टरने पसरविण्यात आला. ५ ला अरुण मोटघरे यांच्या माहितीवरुन रामु लांजेवार यांनी मुरुम टाकल्याचे कबुल केले. यादे लांजेवार यांनी ३ ट्रॅक्टर मुरुम भरलेले व १ रावडीवाला ट्रॅक्टर जप्ती करुन तहसील कार्यालयात आणला. यापैकी दोन ट्रॅक्टर रॉयल्टी असल्यामुळे सोडून दिली व रावडी लावलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्ती करुन ठेवला. काही दिवसानंतर म्हण्जो १८ ला उपविभागीय अधिकारी यांनी दंडाची रक्कम ८ लक्ष १० हजार रुपये भरा नाहीतर ट्रॅक्टर सोडता येणार नाही असे सांगितले. ३ ला झालेल्या अवैध मुरुम उत्खननासंबंधी माझा काहीही संबंध नाही तरीही माझा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला अशी तक्रार रामु लांजेवार यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.आमरण उपोषणाचा इशाराच्या अवैध मुरुम उत्खननाप्रकरणी माझा कुठलाही संबंध नसताना ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. या अन्याया विरोधात उद्या २१ नोव्हेंबरपासुन रामु लांजेवार कुटुंबीयासोबत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसेल, असा इशाराही लांजेवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.