७६ वर्षांपासूनची परपंरा सुरुच
By Admin | Updated: September 3, 2014 23:07 IST2014-09-03T23:07:43+5:302014-09-03T23:07:43+5:30
मागील चार पिढ्यांपासून म्हणजे ७६ वर्षापासून भंडाऱ्यातील पातुरकर कुटुंबाकडे महालक्ष्मी प्रतिष्ठापणेची परंपरा सुरू आहे. चौथ्या पिढीकडूनही परंपरा कायम आहे. गणेश चतुर्थीच्या आगमनानंतर त्यांच्या घरी

७६ वर्षांपासूनची परपंरा सुरुच
वातावरण भक्तीमय : महालक्ष्मीची उत्साहात प्रतिष्ठापणा
भंडारा : मागील चार पिढ्यांपासून म्हणजे ७६ वर्षापासून भंडाऱ्यातील पातुरकर कुटुंबाकडे महालक्ष्मी प्रतिष्ठापणेची परंपरा सुरू आहे. चौथ्या पिढीकडूनही परंपरा कायम आहे. गणेश चतुर्थीच्या आगमनानंतर त्यांच्या घरी महालक्ष्मीची प्रतिष्ठापणा करण्यात आलेली आहे.
७६ वर्षापुर्वी केशव विठ्ठलराव पातूरकर यांनी महालक्ष्मीची पहिल्यांदा प्रतिष्ठापणा केली होती़ चौथी पिढीतील आनंद राजाभाऊ पातुरकर यावेळी म्हणाले, महालक्ष्मी वास्तव्याची आम्हाला अनेकदा प्रचिती आली़ स्वप्नात दृष्टांतही दिला. त्यांच्यारुपाने अनेक संकटे टळली आहे़ महालक्ष्मीची प्रचिती आजोबांनी सदस्यांना पटवून दिलेली आहे़ नवसाला पावणाऱ्या या महालक्ष्मीची आमच्या घरी भक्तीभावाने प्रतिष्ठापणा केली जाते़
पातूरकर कुटुंबांमध्ये तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंड आहेत़ महालक्ष्मीच्या किमयेमुळे साक्षात दैवत ठरली आहे़ महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली़ नैवद्य दाखविल्यानंतर दर्शनासाठी खुले करण्यात येईल़ सुनिता राजाभाऊ पातूरकर यांनी महालक्ष्मीचे महात्म्य सांगताना अनेक स्वप्नदृष्टांत दिले़ यातील एक दृष्टांत सांगताना त्या म्हणाल्या, २५ वर्षापुर्वी विहिरीत महालक्ष्मीचे मुखवटे विसर्जीत केले होते़ त्यानंतर त्यांना महालक्ष्मीचे दर्शन झाले होते. त्यावेळी आंबिल चटणी खाईन, तुझ्याच घरी राहीन, असा दृष्टांत दिला होता़ पातूरकर कुटूंबियांमध्ये महालक्ष्मीविषयी नितांत श्रद्धा असून ते मोठ्या भक्तीभावाने महालक्ष्मीची पूजाअर्चना करतात़ स्थापनेच्या तिसऱ्या दिवशी हळदीकुंकू कार्यक्रम घेतला जातो़ (प्रतिनिधी)