जिल्ह्यात ७.५० लाख वृक्ष लागवड होणार

By Admin | Updated: June 11, 2016 00:33 IST2016-06-11T00:33:12+5:302016-06-11T00:33:12+5:30

पर्यावरणाचा ढासळलेला समतोल सुरळीत करण्यासाठी १ जुलै रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासन राबविणार आहे.

7.50 lakh trees will be planted in the district | जिल्ह्यात ७.५० लाख वृक्ष लागवड होणार

जिल्ह्यात ७.५० लाख वृक्ष लागवड होणार

विविध विभागांना उद्दिष्ट : सामाजिक वनीकरणाकडे रोपांची मागणी नोंदविण्याचे आवाहन
भंडारा : पर्यावरणाचा ढासळलेला समतोल सुरळीत करण्यासाठी १ जुलै रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासन राबविणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात ७.५० लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. बुधवारला झालेल्या बैठकीत सर्व विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
यासोबतच या कार्यक्रमात लोकसहभाग महत्त्वाचा असल्यामुळे स्वयंसेवी संस्था, स्वयंसहाय्यता बचतगट, निसर्गप्रेमी मंडळ आदींचा सहभाग घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.
प्रत्येक विभागाने दिलेल्या उद्दिष्टानुसार स्थळांची माहिती, गाव, स्थळनिहाय समन्वयकाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, अक्षांश, रेखांश, जागेचा जी.पी.एस. प्रणालीने काढलेला फोटो, खोदण्यात आलेल्या खड्डयाची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी दिले आहे.
झाडे लावण्यासाठी प्रजातीनिहाय रोपांची मागणी सामाजिक वनीकरण विभागाकडे नोंदवावी. त्याचबरोबर ज्या ठिकाणी झाडे लावायची आहेत त्या ठिकाणी रोपे पोहचविण्यासाठी संपर्क अधिकारी नेमावे. २५ ते २९ जून या कालावधीत वृक्षारोपण करावयाच्या ठिकाणी रोपे पोहचविण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
वृक्ष लागवडीची सर्व माहिती शुक्रवारपर्यंत आॅनलाईन अपलोड करावी, अशा सूचना निंबाळकर यांनी दिले आहेत. यावेळी भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक एन.आर.प्रविण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुनिल पडोळे, सहाय्यक धर्मदाय आयुक्त जयश्री पुनावाला, सामाजिक वनीकरण सहाय्यक संचालक एन.डब्लू. कावळे तसेच विभागप्रमुख उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

असे आहेत विभागनिहाय उद्दिष्ट
१ जुलै रोजी विभागनिहाय दिलेले उद्दिष्ट याप्रमाणे, वनविभाग ७ लाख २३ हजार, सामाजिक वनीकरण १५ हजार, एफ.डी.सी.एम. १ हजार ७००, कृषी विभाग २० हजार, जिल्हा परिषद २५ हजार, आदिवासी आश्रम शाळा ३ हजार ५००, महसुल विभाग ५ हजार, आरोग्य विभाग ५ हजार, नगर परिषद आणि नगरपंचायत ८ हजार, पोलीस विभाग २ हजार, होमगार्ड ५ हजार, सिंचन विभाग १० हजार, सार्वजनिक बांधकाम २ हजार, अशोक लेलॅन्ड ५ हजार, मॉईल ५ हजार, सनफ्लॅग ५ हजार, कोब्रा बटालियन ५ हजार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, जनता, विद्यार्थी, कर्मचारी, स्वयंसेवी संघटना यांच्या सहकार्याने किमान ५ हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे.

Web Title: 7.50 lakh trees will be planted in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.