72.56 per cent turnout in Bhandara district for graduate constituency | पदवीधर मतदार संघासाठी भंडारा जिल्ह्यात 72.56 टक्के मतदान

पदवीधर मतदार संघासाठी भंडारा जिल्ह्यात 72.56 टक्के मतदान

भंडारा : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी आज झालेल्या निवडणूकीत भंडारा जिल्ह्यात 72.56 टक्के मतदान झाले. प्रमुख राजकीय पक्षांसह 19 उमेदवारांचे भाग्य आज मतपेटीत बंद झाले. जिल्ह्यात सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.

जिल्ह्यात एकुण 18 हजार 434 मतदार असुन यापैकी 13375 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात 9462 पुरुष 3913 स्त्री मतदार आहेत. मतदानाची अंतिम टक्केवारी 72.56 एवढी आहे. सकाळी 8 वाजता मतदान सुरु झाले तेव्हा थोडा प्रतिसाद कमी होता. मात्र दुपारच्या सत्रात मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान केले. जिल्ह्यात सर्वच मतदान केंद्रावर कोविड-19 च्या नियमांचे पालन करुन मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जवाहरनगर, लाखनी, भंडारा येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी त्यांचे सोबत जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत जाधव हे होते. मतदान प्रक्रीया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले.

Web Title: 72.56 per cent turnout in Bhandara district for graduate constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.