आठ ट्रॅक्टरविरुध्द ७१ हजाराचा दंड
By Admin | Updated: March 6, 2016 00:13 IST2016-03-06T00:13:20+5:302016-03-06T00:13:20+5:30
तालुक्यात सध्या सर्रास रेती, मुरूम व गिट्टी चोरी करणे सुरू असून शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे.

आठ ट्रॅक्टरविरुध्द ७१ हजाराचा दंड
महसूल विभागाची कारवाई : गौण खनिजाचा समावेश
तुमसर : तालुक्यात सध्या सर्रास रेती, मुरूम व गिट्टी चोरी करणे सुरू असून शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. शुक्रवारी दिवस तथा रात्री पाच रेतीचे, दोन मुरूम व एक गिट्टीचा ट्रॅक्टर तुमसर तहसीलदारांच्या पथकाने पकडले. त्यांच्यावर ७० हजार ७०० रूपयाचा दंड ठोठावण्यात आला. सध्या हे ट्रॅक्टर तुमसर तहसील कार्यालयासमोर उभे आहेत.
ट्रॅक्टर एमएच ३६ ९८८७, एमएच ३६ एल ४०२९, एमएच ३६ डी ९८४१, एमएच ३६ एल ४१४, एमएच ३६ एल ५६३७ अन्य ट्रॅक्टर विना क्रमांकाचे आहेत. एक ब्रास रेतीवर ५ हजार ४०० रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. शुक्रवार दिवस तथा रात्री दरम्यान तहसीलदार डी.टी. सोनवाने यांच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली. शहराच्या रस्त्यावरून ही अवैध ट्रॅक्टर धावत होते. अवैध गिट्टी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर ७,९०० रूपये व मुरूम ट्रॅक्टरवर ५,४०० रूपये प्रती ब्रास दंड आकारण्यात आला. तहसीलदारांच्या पथकात तलाठी रंगारी, तलाठी पाथरकर यांचा समावेश होता. तुमसर तालुक्यातील लोभी, आष्टी देवनारा व वारपिंडकेपार या नदी घाटांचा लिलाव यावर्षी झाला, अन्य रेती घाटांचा लिलाव अद्याप झाला नाही. माडगी, चारगाव, निलज, सुकळी, बाम्हणी तामसवाडी सिहोरा या प्रमुख नदी घाटांचा लिलाव अद्याप झाला नाही. परंतु या नदी घाटावरून सर्रास रेतीचे उत्खनन करणे सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)