समाधान शिबिरात ७१ लाभार्थ्यांना मिळाला लाभ
By Admin | Updated: October 7, 2015 01:52 IST2015-10-07T01:52:26+5:302015-10-07T01:52:26+5:30
तालुक्यातील सालेभाटा येथे ज्ञानेश्वर विद्यालयात स्थानिक तहसिल कार्यालयाद्वारे महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारित समाधान शिबिराचे आयोजन करून ...

समाधान शिबिरात ७१ लाभार्थ्यांना मिळाला लाभ
सालेभाटा येथे अभियान : शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे तहसीलदारांचे आवाहन
लाखनी : तालुक्यातील सालेभाटा येथे ज्ञानेश्वर विद्यालयात स्थानिक तहसिल कार्यालयाद्वारे महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारित समाधान शिबिराचे आयोजन करून विविध शासकीय कार्यालयामार्फत लोकांना दाखल्यांचे व धनादेशाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार डी.सी. बोंबर्डे उपस्थित होते. उद्घाटक म्हणून जि.प. सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, माजी जि.प. सदस्य नारायण हटवार, मुख्याध्यापक अशोक येळेकर, पंचायत समिती सदस्य मोरेश्वरी पटले, नायब तहसिलदार एस.ए. धारगडे, मंडळ अधिकारी मोहोड, कृषी अधिकारी कुंभारे व इतर शासकीय कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी तहसिलदार व इतर अतिथींच्या हस्ते विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यात तहसिल कार्यालयाद्वारे ४२ जेष्ठ नागरिकांचे प्रमाणपत्र, १२ उत्पन्न, १८ जातीचे प्रमाणपत्र, १२ सातबाराचे उतारे, १६ रहिवासी प्रमाणपत्र १२ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, ११ प्रतिज्ञापत्र व ७ राशन कार्डाचे वितरण करण्यात आले. पंचायत समितीद्वारे ताडपत्री, नायलन जाडीचे वाटप, विद्युत विभागाद्वारे मिटर डिमांडचे वाटप करण्यात आले.
उद्घाटकीय भाषणात ज्ञानेश्वर रहांगडाले यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. जनतेची कामे कमीत कमी वेळात करून कामाची गती वाढविण्याचे आवाहन केले. हटवार यांनी समाधान शिबिरातून दाखल्याचे वितरनाच उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात तहसिलदार बोंबर्डे यांनी विविध शासनाच्या उपक्रमाची माहिती दिली व महाराजस्व अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन जे.एच. गेडाम यांनी केले. आभार प्रदर्शन आर. टी. देशमुख यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)