शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
4
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
5
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
6
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत
7
नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
8
"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!
9
"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..."
10
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
11
मला का जाब विचारता? सूरजलाच विचारा...; धनंजय पोवारचा संताप अनावर, नक्की विषय काय?
12
जो रुटच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम; कपिल पाजींवर पाकविरुद्ध ओढावली होती अशी नामुष्की
13
केरळमध्ये वेगाने पसरला 'ब्रेन ईटिंग अमीबा'; २०२५ मध्ये १७० जणांना संसर्ग, ४२ जणांचा मृत्यू
14
Indigo चे शेअर्स क्रॅश, SpiceJet च्या स्टॉक्सचं उड्डाण; १० टक्क्यांपेक्षा अधिक उसळी, जाणून घ्या कारण
15
या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली...  
16
IndiGo: मोठी बातमी! इंडिगो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा तातडीने सुनावणी करण्यास नकार
17
मोठी बातमी! कुख्यात 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; महाराष्ट्र-छत्तीसगड-मध्य प्रदेश नक्षलमुक्त
18
तीन कोटींचा इनामी माओवादी ‘रामधेर’ शरण, माओवाद्यांच्या ‘एमएमसी’ला आणखी एक धक्का, छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये ११ सहकाऱ्यांसह टाकली शस्त्रे
19
आधार कार्ड खाली पडलं अन् झाली पोलखोल; सौरभ बनून फैजानने अडकवलेलं प्रेमाच्या जाळ्यात
20
Numerology: अंकज्योतिषानुसार 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींवर सदैव राहते लक्ष्मी-कुबेराची कृपा
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर तालुक्यातील ७,०३८ निराधारांना सहा महिन्यांपासून अनुदान मिळालेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 14:29 IST

Bhandara : आधारकार्ड अपडेट केल्यानंतरच अनुदान जमा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत ७०३८ लाभार्थ्यांचे अनुदान आधारकार्ड अपडेट न झाल्याने मागील सहा महिन्यांपासून रखडल्याची माहिती आहे. केवळ ३,१६२ लाभार्थ्यांना मार्च २०२५ पर्यंत अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. त्यामुळे लाभार्थीत प्रचंड असंतोष दिसत आहे. गतिमान शासनात कासवगतीने कामे कसे सुरू आहेत, असा प्रश्न तो उपस्थित होतो.

संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ राज्य निवृत्तिवेतन योजनेचे पैसे डीबीटीद्वारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु, तुमसर तालुक्यात मागील सहा महिन्यांपासून लाभार्थ्यांचे अनुदान रखडल्याने फटका बसत आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात लाभार्थ्यांना औषधोपचार व इतर कामाकरिता नियमित अनुदान मिळण्याची व्यवस्था शासनाने करावी, अशा भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या. परंतु, त्याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. 

एकूण लाभार्थी १०,२००; ३,१६२ लाभार्थ्यांना अनुदानतुमसर तालुक्यात लाभार्थ्यांची संख्या १० हजार २०० आहे. त्यापैकी ७ हजार ८४१ लाभार्थी डीबीटी ऑनबोर्ड झाले आहेत, अशी माहिती तहसील कार्यालयामार्फत देण्यात आली. ३ हजार १६२ लाभार्थ्यांना माहे मार्च २०२५ पर्यंत डीबीटीद्वारे अनुदान त्यांच्या खात्यात जमा झाले असल्याचे पोर्टलवर दिसून येत आहे. ७ हजार ३८ लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.

आधारकार्ड अपडेटची प्रक्रिया सुरूलाभार्थ्यांचे आधारकार्ड अपडेटची कारवाई सुरू आहे. आधारकार्ड अपडेट झाल्यानंतरच खात्यात डीबीटीद्वारे अनुदान जमा होईल, अशी माहिती तहसील कार्यालयाने कळविली आहे.

"संजय गांधी, इंदिरा गांधी व श्रावणबाळ लाभार्थ्यांची थट्टा शासनाकडून सुरू आहे गतिमान शासन असल्यानंतरही येथे अनुदान लाभार्थ्यांना सहा महिन्यापासून मिळत नाही. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता लाभार्थ्यांसोबत तीव्र आंदोलन करण्यात येईल."- चरण वाघमारे, माजी आमदार, तुमसर

टॅग्स :bhandara-acभंडारा