नागपुरात ६० युवक - युवतींना मिळाला रोजगार

By Admin | Updated: October 27, 2016 00:34 IST2016-10-27T00:34:29+5:302016-10-27T00:34:29+5:30

तुमसर तालुक्यातील ६० युवक - युवतींना नागपुरात रोजगार प्राप्त झाले आहे. यात ४५ युवती व १५ युवकांचा समावेश आहे.

60 youths in Nagpur - Employment for women | नागपुरात ६० युवक - युवतींना मिळाला रोजगार

नागपुरात ६० युवक - युवतींना मिळाला रोजगार

कौशल्य विकास कार्यक्रम : ग्रामीण युवकं-युवतींचा समावेश
तुमसर : तुमसर तालुक्यातील ६० युवक - युवतींना नागपुरात रोजगार प्राप्त झाले आहे. यात ४५ युवती व १५ युवकांचा समावेश आहे. दिनदयाल उपाध्याय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत त्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. ग्रामीण व दुर्गम गावातील युवकांचा यात समावेश आहे.
स्टार्ट अप इंडिया अंतर्गत प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता केंद्र शासन व राज्य शासनाच्या विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत तुमसर तालुक्यातील ६० युवक युवतींना विविध रोजगारासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यात ग्रामीण व दुर्गम गावातील युवक, युवतींचा समावेश आहे. त्यांना नागपुरातील विविध मोठे हॉटेल, मॉल व मोठ्या संस्थेत रोजगार प्राप्त झाला असून दरमहा अनुक्रमे १५ हजार, १० हजार, ८ हजार वेतन मिळते. मुख्य प्रवाहात येण्याकरिता ही संधी येथे प्राप्त झाली आहे. खंडविकास अधिकारी मनोज हिरुडकर, आ.चरण वाघमारे सह पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याकरिता विशेष परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 60 youths in Nagpur - Employment for women