खडकीत घर भस्मसात ६० हजारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:58 IST2018-11-26T22:58:00+5:302018-11-26T22:58:13+5:30
उंदराने पेटती ज्योत नेल्याने कपड्यांना लागलेल्या आगीत घरातील साहित्यच जळून खाक झाले. ही घटना खडकी येथील बोवा टोलीवर सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे घडली. या आगीत जवळपास ६० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

खडकीत घर भस्मसात ६० हजारांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : उंदराने पेटती ज्योत नेल्याने कपड्यांना लागलेल्या आगीत घरातील साहित्यच जळून खाक झाले. ही घटना खडकी येथील बोवा टोलीवर सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे घडली. या आगीत जवळपास ६० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
माहितीनुसार, ओमप्रकाश देशमुख व त्यांची पत्नीने सकाळी १० वाजताच्या सुमारास घरातील पुजास्थळी ज्योत लावली. त्यानंतर घरातील सर्व मंडळी कामानिमित्त घराला कुलूप लावून निघून गेले. याच दरम्यान उंदराने पेटती वात कापडांवर नेल्याने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. घडली.
घरातील साहित्य जळून धुराचे लोळ बाहेर दिसताच घराशेजारील नागरिक धावले. त्यांनी घराचा कुलूप तोडून आत प्रवेश केला. दोन तास आग विझविण्यासाठी धावपड सुरु राहिली. मात्र, तोपर्यंत घरातील अन्नधान्य, कपडे, लाकडी फर्निचर, टिव्ही, कुलर, पलंग, गादया, प्लास्टिक सुटकेश व त्यामधील कागदपत्रे, गोदरेज मधील कपडे व कागदपत्रे, तसेच नगदी ५ हजार रुपये, सोन्याचे दागिणे, लाकुडफाटा आदी साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती माजी उपसरपंच शर्मा बोंदरे यांना होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तलाठी व करडी पोलिसांना माहिती दिली.
पालोराचे तलाठी कांबळे, कोतवाल अनिल वैद्य यांनी घटनेचा पंचनामा केला. वरिष्ठांना अहवाल सादर करून मदत दिली जाईल, असे आश्वासन तलाठी कांबळे यांनी दिले. जिल्हा परिषद सदस्या सरीता चौरागडे यांनी सुध्दा आपदग्रस्ताला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.