६० टक्के रोवणी
By Admin | Updated: August 7, 2014 23:46 IST2014-08-07T23:46:16+5:302014-08-07T23:46:16+5:30
जिल्ह्यात पावसाच्या दमदार आगमनामुळे अजूनपावेतो ६० टक्के रोवणी झाली आहे. सर्व पिकांची एकुण रोवणीची टक्केवारी ६५ इतकी आहे. खरीप हंगामातील हा आकडा पिकाच्या उत्पादनाअंतर्गत अनुकूल नाही.

६० टक्के रोवणी
भंडारा : जिल्ह्यात पावसाच्या दमदार आगमनामुळे अजूनपावेतो ६० टक्के रोवणी झाली आहे. सर्व पिकांची एकुण रोवणीची टक्केवारी ६५ इतकी आहे. खरीप हंगामातील हा आकडा पिकाच्या उत्पादनाअंतर्गत अनुकूल नाही. पावसाचे सर निरंतर असल्यास रोवणीच्या कामाला वेग येईल.
भंडारा जिल्ह्यात जवळपास दोन लाखापेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रात धानासह अन्य पिकांची लागवड करण्याचे उदिष्ठ आहे. त्यापैकी भंडारा तालुक्यात २२हजार ८८८ हेक्टर, मोहाडी २८ हजार ८३०, तुमसर २८ हजार २४०, पवनी २९ हजार ३१३, साकोली २२ हजार ७०, लाखनी २० हजार ५३० तर लाखांदूर तालुक्यात २९ हजार ७२० हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्याचे उदिष्ठ आहे.
जिल्ह्यातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी भंडारा तालुक्यात २७हजार ८८ हेक्टर, मोहाडी ३० हजार ४६६, तुमसर २९ हजार १७७, पवनी ३५ हजार ३७८, साकोली २२ हजार ९३०, लाखनी २१ हजार ६१० तर लाखांदूर तालुक्यात ३१ हजार ९९० हेक्टर क्षेत्रात सर्व पिकांची लागवड करण्याचे उदिष्ठ आहे.
भंडारा जिल्ह्यात धानाची रोवणी ६० टक्क्याच्या आसपास आटोपली आहे. गत दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने रोवणीचे मंदावले आहे. ज्यांच्याकडे पाण्याची किंवा सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे तिथे मात्र रोवणीचे काम जोमात सुरु आहे. कडधान्यामध्ये भूईमुग, तिळ, सोयाबीन व इतर गळीत धान्याची लागवड केली जात आहे. त्याचप्रकारे पाच हजार पेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रामध्ये उसाची लागवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील दोन्ही कृषी उपविभागांतर्गत ९८ हजार ९६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाल्याची माहिती आहे. याची एकुण टक्केवारी ५४.२० इतकी आहे. पावसाच्या हजेरीवर धान पऱ्हे लागवडीची गती अवलंबून राहणार आहे. बळीराजाला पुन्हा दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यंदा उशिरा सुरू झालेल्या रोवणीमुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. ज्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी पावसापूर्वी विहीरीच्या पाण्याने रोवणी केली, त्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पादन होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात भातपिकासोबतच तृणधान्यात तूर, मुंग, उडीद तर कडधान्यात भूईमुंग, खरीप तीळ,सोयाबीन, इतर गळीत धान्यासह हळद, अद्रक, मिरची व भाजीपाल्याचे पिक घेण्यात आले. मागील वर्षी बऱ्यापैकी पाऊस पडल्याने याच तारखेपर्यंत झालेल्या रोवणीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी असल्याने रोवणीचे प्रमाण कमी झाले आहे. (शहर प्रतिनिधी)