शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कसलं भारी राव; महाराष्ट्रातल्या अभयारण्यातील सहा वाघ एकत्र पाहून म्हणाल Wowww!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2022 21:32 IST

अलीकडे उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य वाघ्र दर्शनासाठी प्रसिद्धीस येत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून एकाच वेळी सहा वाघांचे दर्शन होत आहे.

ठळक मुद्देउमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य चर्चेतशॅडो वाघिणीसह तिचे तीन बछडे आणि अन्य दोन वाघांचा मुक्त संचार

अशोक पारधी

पवनी (भंडारा) : अभयारण्यात गेल्यावर वाघाचे दर्शन हाेईलच, याची खात्री नसते. अनेक पर्यटकांना निराश हाेऊनही अभयारण्यातून आल्या पावली परतावे लागते. दाेनदा-तीनदा अभयारण्यात सफारी केली तरी जंगलाच्या राजाचे दर्शन हाेत नाही. असे असताना एक, दाेन, तीन नव्हे तर चक्क सहा वाघांनी पर्यटकांना दर्शन दिले. असा हा दुर्मिळ याेगायाेग उमरेड - पवनी - कऱ्हांडला अभयारण्यात शनिवारी जुळून आला. सहा वाघ दिसण्याचा हा ‘याेग’ व्हिडिओमध्ये कैद करण्यात आला असून ताे व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल हाेत आहे. त्यामुळे आता पवनी गेटवर पर्यटकांची मोठी गर्दी वाढत आहे.

अलीकडे उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य वाघ्र दर्शनासाठी प्रसिद्धीस येत आहे. भंडारा जिल्ह्यात समृद्ध वनसंपदा असून, नवेगाव - नागझिरा, कोका आणि उमरेड - पवनी - कऱ्हांडला अशी तीन अभयारण्य आहेत. जैवविविधतेसाठी प्रसिद्ध या अभयारण्यांत मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा संचार आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी गेटमधून प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना हमखास वाघांचे दर्शन होते. त्यामुळे येथे पर्यटकांची कायम गर्दी असते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून एकाच वेळी सहा वाघांचे दर्शन होत आहे. शनिवारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना प्रसिद्ध शॅडो वाघिणीसह तिचे तीन बछडे आणि अन्य दोन वाघांचे दर्शन झाले. त्यांनी वाघांचा मुक्त संचार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. अभयारण्य पावसाळ्यात बंद होत असल्याने त्यापूर्वी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येऊ लागले आहेत.

ही पहिलीच वेळउमरेड - पवनी - कऱ्हांडला अभयारण्यात एकाच वेळी सहा वाघांच्या दर्शनाचा अभूतपूर्व योग शनिवारी पर्यटकांना अनुभवता आला. यापूर्वी या अभयारण्यात एकाच वेळी तीन वाघांचे दर्शन गत महिन्यात झाले होते. शॅडो वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांचे दर्शन अनेकदा झाले होते. मात्र, एकाच वेळी सहा वाघ दिसण्याची या अभयारण्यातील ही पहिलीच वेळ आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणTigerवाघforestजंगलnagpurनागपूर