शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

५२९ कोंबड्यांच्या उष्णतेमुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 15:22 IST

सोनपुरी येथील घटना : दीड लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : शेतीपूरक कुक्कुटपालन व्यवसायांतर्गत उभारलेल्या पोल्ट्री फार्ममधील तब्बल ५२९ कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला. यामुळे सोनपुरी येथील शेतकरी गिरीश प्रकाश कठाणे यांचे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारला उघडकीला आली.

दरम्यान, सलग सहा तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे असून, संबंधितांवर कारवाईची मागणी करीत नुकसानभरपाई मागितली आहे. पोल्ट्री फार्मसाठी कठाणे यांनी वीजपुरवठ्यासंदर्भात विद्युत रोहित्रासाठी दोन लाख भरले होते. बुधवार, दि.२६ जूनला सकाळी ८ वाजता अचानक वीजपुरवठा खंडित झाला. कठाणे यांनी एकोडी महावितरण अभियंत्यांना फोन केला. येथे २४ तास वीजपुरवठा संलग्न केला आहे व उष्णतेने पक्ष्यांची दयनीय अवस्था होत ते मृत्यू पावत आहेत. वीज गेल्यानंतर पोल्ट्री फार्मवरील कर्मचाऱ्यांनी उष्णतेमुळे पक्षी वाचविण्यासाठी त्यांना थंड पाण्यात टाकून काढणे, ही क्रिया करीत कोंबड्या वाचविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले; पण ते प्रयत्न विफल ठरले. यानंतर फोनवरच महावितरण अभियंत्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत वीज सुरू होणार नाही, असे शेतकऱ्यास सांगितले.

६ तासांपेक्षा जास्त काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने उष्णतेमुळे बुधवारला ४७२, तर गुरुवारला पहाटे ५७ कोंबड्यांचा मृत्यू झाला. दोन लाख रुपये भरून ट्रान्सफॉर्मर बसविले, जेणेकरून या कुक्कुटपालन व्यवसायाला २४ तास वीज अबाधित उपलब्ध राहील; पण महावितरणच्या दिरंगाईमुळे पाचशेच्यावर कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला. यात शेतकऱ्याचे एकूण दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. सदर नुकसानभरपाईची मागणी शेतकरी गिरीश प्रकाश कठाणे यांनी महावितरणकडे केली आहे. यापुर्वीही लाखनी तालुक्यात उष्णतेमुळे कोंबड्या दगावल्या होत्या.

"गत १० वर्षांपासून शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहे. यासाठी मी १२ लाख रुपयांचे कर्ज घेतले. मला नेहमीच महावितरणकडून वीजपुरवठा खंडित होणे, या समस्येला लागते. महावितरणच्या तोंड द्यावे निष्काळजीपणाने माझे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. महावितरणने हे नुकसान तातडीने भरून द्यावे."- गिरीश कठाणे, पोल्ट्री फार्मचालक, सोनपुरी

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूbhandara-acभंडारा