५० हजार पटप्रेमींनी घेतला शंकरपटाचा आनंद
By Admin | Updated: January 27, 2015 23:27 IST2015-01-27T23:27:17+5:302015-01-27T23:27:17+5:30
येथील ऐतिहासिक स्वातंत्र्याची पार्श्वभूमी लाभलेल्या बैलांच्या शंकरपटाचे गणराज्य दिनापासून तीन दिवस आयोजन केले आहे. या शंकरपट प्रेमीनी आनंद लुटला. या शंकरपटात मोठ्या

५० हजार पटप्रेमींनी घेतला शंकरपटाचा आनंद
गोसे (बुज.) : येथील ऐतिहासिक स्वातंत्र्याची पार्श्वभूमी लाभलेल्या बैलांच्या शंकरपटाचे गणराज्य दिनापासून तीन दिवस आयोजन केले आहे. या शंकरपट प्रेमीनी आनंद लुटला. या शंकरपटात मोठ्या संख्येने बैलजोड्या सोडण्यात आल्या. विजेत्या बैलजोड्यांना बक्षीसे देण्यात आले. शंकरपटाच्या आयोजनाचे हे ५८ वे वर्ष होते.
येथे दरवर्षी गणराज्य दिनी २६ जानेवारीला शंकरपटाचे आयोजन करण्यात येते. येथील शंकरपट पूर्ण विदर्भात प्रसिध्द आहे. त्यामुळे दुरुन विदर्भातून हा शंकरपट पाहायला शंकरपटप्रेमी आले होते. येथील व परिसरातील गावातील प्रत्येक घर पाहूण्यांनी भरले होते. या दिवशी येथे सणासारखे वातावरण होते. येथील शंकरपटाला स्वातंत्र्याची पार्श्वभूमी असल्यामुळे या शंकरपटाने आपले वेगळेच महत्व राखले आहे. भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा पूर्ण देशात स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा केला जात होता. गोसे (बुज) येथे हा आनंदोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिनी माजी सरपंच स्व. झिबल भगत यांच्या मार्गदर्शनात १९५८ ला या शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर स्व. महादेव आवारी यांनी ही परंपरा सुरु ठेवली. ही परंपरा आजही सुरु आहे. मधल्या काळात शंकरपटाच्या जागेवर गोसीखुर्द धरणाची वसाहत होणार होती. पण येथील शंकरपट प्रेमी जनतेनी या वसाहतीला विरोध करुन वसाहत होवू दिली नाही.
यावर्षी हा शंकरपट पाहण्याकरीता लांबून लोकांचे येणे सकाळपासूनच सुरु होते. दुपारपर्यंत ५० हजार पर्यंत शंकरपट प्रेमी जमा झाले होते. विधिवत पुजा करुन शंकरपटाचे उद्घाटन करण्यात आले. नंतर एका मागून एक जोड्या सुटने सुरु झाले.
पुर्ण शंकरपटाचे मैदान लोकांनी गर्दीने व्यापून टाकले होते. शंकरपट प्रेमी जनता धावणाऱ्या जोड्यांना आवाज देवून प्रोत्साहन देत होते. विजेत्या बैलजोड्यांना शंकरपट समिती ग्रामपंचायत तर्फे आकर्षक बक्षीसे देण्यात आले. शंकरपटात विविध प्रकारचे दुकाने शेतीची अवजारे, हॉटेल, मोठ्या प्रमाणात लागली होती. शंकर पटातील आकाशझुले तरुणी, तरुणी लहान मुलांचे आकर्षणाचे केदं्र होते. मेंढा पुनर्वसन येथे नाटकाचे तर गोसे (बुज) येथे खडी गमतचे आयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)