५० कोेटींचे चुकारे अडले

By Admin | Updated: August 15, 2015 01:00 IST2015-08-15T01:00:22+5:302015-08-15T01:00:22+5:30

जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी गतवर्षी उत्पादनात झालेल्या कमालीच्या घटमुळे धान खरेदीत घट झाली आहे.

50 coat picks up | ५० कोेटींचे चुकारे अडले

५० कोेटींचे चुकारे अडले

शेतकरी डबघाईस : जिल्ह्यात १०६ कोटींची ७.८० लाख क्विंटल धान खरेदी
लोकमत विशेष
देवानंद नंदेश्वर  भंडारा
जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी गतवर्षी उत्पादनात झालेल्या कमालीच्या घटमुळे धान खरेदीत घट झाली आहे. यावर्षांत एकूण ७ लाख ८० हजार ६१५ क्विंटल धान खरेदी करण्यात आली़ १०६ कोटी १९ लाख ८४ हजार रूपयांची धान खरेदी झाली असून शेतकऱ्यांचे ५० कोटी २ लाख ४४ हजार रुपयांचे चुकारे अडले आहे.
भंडारा जिल्ह्यात मागील खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला होता़ निसर्गाच्या प्रकोपामुळे धान पिक उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. मिळेल त्या आशेने शेतकऱ्यांनी धानाचे चुरणे केले़ मात्र यावर्षी सुरुवातीला धान खरेदी केंद्र सुरू करण्यास उशीर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना धान विकावे लागले. विविध संघटनांच्या आक्रमक भूमिकांमुळे जिल्ह्यात १ आॅक्टोंबरपासून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. जिल्ह्यात ५२ धान खरेदी केंद्र उघडण्याचे निश्चित झाले असले तरी प्रत्यक्षात मात्र ४९ केंद्रांवर धान खरेदी करण्यात आली. उच्च प्रतिच्या धानाला प्रती क्विंटल १,४०० रूपये तर साधारण प्रतिच्या धानाला १,३६० रुपये आधारभूत किंमत देण्यात आली. १ आॅक्टोंबर २०१४ ते ३० जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात एकूण ७ लाख ८० हजार ६१५ क्विंटल धान खरेदी करण्यात आली़ यात भंडारा तालुक्यात २४ हजार ५२५.८५, मोहाडी तालुक्यात ६० हजार ८२२.८५, तुमसर तालुक्यात १ लाख २३ हजार १४०.३९, लाखनी तालुक्यात १ लाख ६९ हजार २५३.५५, साकोली तालुक्यात १ लाख २९ हजार ६५३.४०, लाखांदूर तालुक्यात १ लाख ९५ हजार ७५४.८० तर पवनी तालुक्यात ७७ हजार ४६४.६० क्विंटलचा समावेश आहे.
भरडाईनंतर १.३५ क्विंटल धान शिल्लक
सन २०१४-१५ मध्ये भंडारा १०६ कोटी १९ लाख ८४ हजार २९८ रुपयांची धान खरेदी करण्यात आली़ यातील सहा लाख ४५ हजार ५८९.४० क्विंटल धान भरडाईसाठी ४४ मिलर्सना देण्यात आली. प्रत्यक्षात सहा लक्ष ३८ हजार ८०९.३५ क्विंटल धानाची भरडाई झाली. यात ६ हजार ७८०.१० क्विंटल धान भरडाईत घट निर्माण झाली. सध्या १ लाख ३५ हजार २६.०४ क्विंटल धान गोदामात शिल्लक आहे. एकूण झालेल्या ६ लाख ४५ हजार ५८९ धानभरडाईनंतर ६७ टक्के प्रमाणे प्रस्तावित चार लाख २८ हजार २.२३ क्विंटल तांदूळ मिळाला असून एफसीआयकडे ४ लाख ९ हजार ७५.२६ क्विंटल तांदूळ जमा करण्यात आलेला आहे. यावर्षी धान भरडाईसाठी मिलसमध्ये वाढ झाली आहे.
१०६.१९ कोटींची धानखरेदी
जिल्ह्यात १०६ कोटी १९ लाख ८४ हजार २९८ रुपयांची धान खरेदी करण्यात आली़ यात ८ हजार ६८२ क्विंटल धान अ ग्रेड, तर ७ लाख ७१ हजार क्विंटल साधारण धानाचा समावेश आहे. एकूण १०६ कोटी १९ लाख ८४ हजार २९८ रुपयांची खरेदी कण्यात आली. त्या रक्कमेपैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेमध्ये १२२ कोटी २७ लाख ७० हजार ७५३ रुपयांची हुंडी दाखल करण्यात आली आहे़ शेतकऱ्यांना धानाचा मोबदला म्हणून ७२ कोटी २५ लाख २६ हजार ३४८ रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली़ ५० कोटी २ लाख ४४ हजार ४०५ रुपयांचे चुकारे अडले़
बोनस वितरण थंडबस्त्यात
आधारभूत धान केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने प्रती क्विंटल २५० रुपये बोनस देण्याची घोषणा केली. त्यानंतर बोनसपोटी ३ कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाल्याची माहिती आहे. परंतु बोनसची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही. धानाचे चुकारे व बोनस केव्हा मिळणार याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखविणाऱ्या शासनाने शेतकऱ्यांनाच अडचणीत आणले आहे.

Web Title: 50 coat picks up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.