उन्हाळी धानाचे ५ कोटीचे चुकारे जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:40 IST2021-09-12T04:40:47+5:302021-09-12T04:40:47+5:30

पालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील सेवा सहकारी संस्थेचे ६४९ शेतकऱ्यांचे चार कोटी ९९ लक्ष १५ हजार २०१ रुपये ...

5 crore errors in summer grains | उन्हाळी धानाचे ५ कोटीचे चुकारे जमा

उन्हाळी धानाचे ५ कोटीचे चुकारे जमा

पालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील सेवा सहकारी संस्थेचे ६४९ शेतकऱ्यांचे चार कोटी ९९ लक्ष १५ हजार २०१ रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. इतरही खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांचे पेमेंट जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा पालांदूर येथे जमा झाले आहेत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र बोनसची रक्कम अजूनही प्रतीक्षेत आहे.

जून व जुलै महिन्यात खरेदी करण्यात आलेल्या धानाचे पूर्ण पेमेंट खात्यात जमा झाले आहेत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला निश्चितच सणासुदीच्या दिवसात समाधान लाभले आहे. आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या उन्हाळी धानाची रक्कम बँक खात्यात जमा झाली. परंतु बँकेला सलग तीन दिवसाच्या सुट्ट्या आल्याने शेतकऱ्यांना सोमवारपर्यंत चुकाऱ्यासाठी वाट पाहावी लागेल.

Web Title: 5 crore errors in summer grains