भंडारा : देशी दारुचा अवैध साठा असल्याच्या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तीन ठिकाणी छापे घातले. यात ४७ हजार रुपये किंमतीचा दारुसाठा जप्त करून तिघांना अटक केली.आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हातभट्टी देशी व विदेशी दारुची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री होते. त्यासाठी अनेक ठिकाणी दारुंचा अवैध साठा करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पथकाने तीन ठिकाणी छापे घातले. यात पहेला, मांगली व ताडेश्वर वॉर्ड पवनी येथे घातलेल्या छाप्यातून ४७ हजारांची देशी दारुच्या ३० पेट्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत सावळराम भुरले, गिरधर भुरे व राजू उपरीकर या तिघांना अटक केली.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांचे नेतृत्वात भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक आव्हाड, निरीक्षक पापेवार, संजय कोवे, मुरली आनकाडे यांनी केली. या कारवाईने अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. (शहर प्रतिनिधी)
४७ हजारांची दारु जप्त
By admin | Updated: October 5, 2014 23:01 IST