१९ संचालकपदासाठी ४६ उमेदवार रिंगणात
By Admin | Updated: February 5, 2017 00:19 IST2017-02-05T00:19:12+5:302017-02-05T00:19:12+5:30
येथील कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ४६ उमेदवार रिंगणात असून १,६११ मतदार १९ संचालक निवडणार आहेत.

१९ संचालकपदासाठी ४६ उमेदवार रिंगणात
लाखांदूर बाजार समितीची निवडणूक आज : १,६११ मतदार निवडणार १९ संचालक
लाखांदूर : येथील कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ४६ उमेदवार रिंगणात असून १,६११ मतदार १९ संचालक निवडणार आहेत. भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढवित आहे.
संचालकपदाच्या १९ जागांमध्ये सेवा सहकारी सोसायटी गटातून ११, ग्रामपंचायत गटातून ०४, पणन गटातून ०१, हमाल (तोलारी) गटातून ०१, व्यापारी (अडते) गटातून ०२ असे १९ संचालक निवडून द्यायचे आहेत. यामध्ये २३२ व्यापारी व अडते मतदार, २३७ हमाल मतदार, ६०५ सेवा सहकारी मतदार, ५०० ग्रामपंचायत मतदार, ३७ पणन प्रक्रिया गटातील असे १,६११ मतदार आहेत. भाजपा प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनेल व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार सुधार पॅनेल व अपक्ष असे ४६ उमेदवारांनी या निवडणुकीसाठी नामांकन दाखल केले आहे. त्यापैकी दोन उमेदवारांनी दुसऱ्यांना समर्थन दिले आहे.
सेवा सहकारी संस्थेतून ११ संचालक निवडायचे असुन आरक्षणानुसार सर्वसाधारण गटातून ७ जागेसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये नरेश खरकाटे, संतोष गोंधळे, विलास तिघरे, तेजराम दिवठे, नरेश दिवठे, नानाजी देसाई, गजानन नाकतोडे, रमेश निमजे, रेवाराम निखाडे, यादव परशुरामकर, रमेश पारधी, व्यंकट पिलारे, नरेश बेदरे, वामन बेदरे, देविदास भोयर, सुरेश येनोडकर, सुभाष राऊत, मधुकर रोहणकर, यशवंत हरडे, ईतर मागासवर्गीय गटातील एका जागेसाठी योगेंद्र फुंडे व विजय फुंडे, याच गटातील अनुसूचित जाती, जमाती गटामधून एका जागेसाठी मारोती गोमासे व गजानन दिघोरे तर महिला गटातून २ जागांसाठी निमा ठाकरे, पुष्पा देशमुख, मंदा भागडकर व उर्मिला राऊत रिंगणात आहेत.
ग्रामपंचायत मतदार प्रवर्गात सर्वसाधारण गटात ७ उमेदवार रिंगणात आहेत. यात संजय कोरे, गोपाल परशुरामकर, दादाजी पिलारे, देविदास राऊत, मार्तंड हुकरे, अनुसूचित जाती, जमाती गटातून एका जागेसाठी सुनील भोवते, गोपाल मेंढे तर आर्थिक दुर्बल गटातून एका जागेसाठी धनराज ढोरे, शामकुमार दिवठे, व्यापारी व अडते मतदार गटातून दोन जागेसाठी मुकेशकुमार भैय्या, गोपीचंद राऊत, रमेश राऊत, रविंद्र राऊत, हमाल व तोलारी गटातून १ जागेसाठी मनोज मेश्राम, संजय राऊत, पणन व प्रक्रिया गटातून सदाशिव खेत्रे व सुरेश ब्राम्हणकर असे ४४ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत कोणता पॅनेल विजयी होईल, हे निकालाअंती कळून येईलच. (शहर प्रतिनिधी)