चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे तब्बल ४५२ घरांची पडझड झाली असून ४६ लाख ७० हजार रूपयांचे नुकसान झाले. तहसील कार्यालयाच्यावतीने केलेल्या सर्वेक्षणात ही नुकसानीची आकडेवारी पुढे आली आहे.लाखनी तालुक्यात गुरूवारी झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार उडाला होता. लाखनीसह अनेक गावे जलमय झाली होती. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले. तहसील कार्यालयाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले असून अंशता नुकसान झालेल्या घरांची संख्या ४२५ असून यात ३९ लाख ५० रूपयांचे नुकसान झाले. तर नऊ घरे पूर्णत: बाधित झाली असून त्यात सहा लाख २५ हजार रूपयांचे नुकसान झाले. तालुक्यात १८ गोट्यांची पडझड होवून ९५ हजार रूपयांचे नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे ९४ कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले. कपडे, भांडे व अन्न धान्याचे नुकसान झाले आहे. मात्र जीवितहानी झाली नाही. केवळ एक वासरू पाण्यात वाहून गेले.तालुक्यात मुरमाडी-सावरी येथील ४० घरात नाल्याच्या पुराचे पाणी शिरले होते. तर रेंगेपार कोठा येथील तलाव ओव्हरफ्लो झाल्याने ३३ घरात पाणी शिरले. तसेच लाखनी, सावरी, सोमलवाडा, मेंढा, केसलवाडा वाघ, गराडा, किन्ही, दैतमांगली, चिखलाबोडी, गोंडसावरी, रेंगेपार कोठा, खेडेपार, लाखोरी, आलेसूर, पिंपळगाव सडक, सामेवाडा, रेंगेपार कोहळी, चिचटोला, सालेभाटा, मासलमेटा, बोरगाव, केसलवाडा पवार, परसोडी, मुंडीपार, सिद्धीपार, मारेगाव, राजेगाव, निलागोंदी, इसापूर, मचारणा, मांगली, रेंगोळा, पोहरा, कनेरी, पेंढरी, चालना, धानला, सिपेवाडा, मानेगाव, मेंढा पोहरा, पालांदूर, मºहेगाव, पाथरी आदी गावात घरांची पडझड झाली आहे. या सर्वांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.२४०० हेक्टर शेती पाण्याखालीलाखनी तालुक्यात २० व २१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीने २४०० हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. त्यापैकी ३३ टक्केच्या आतमध्ये १६९६ हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले आहे. भाजीपाला पिकांचे ७३.५० हेक्टर क्षेत्र पुरामुळे बाधित झाले. तालुक्यातील १९९० भात उत्पादक तर १६८ भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.पुराचे पाणी शेतात शिरून पिकांचे नुकसान झाल्यास वयक्तीक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित करावी. सदर माहिती संबंधित बँक, विमा कंपनी किंवा कृषी व महसूल विभागात देणे आवश्यक आहे.- पद्माकर गिदमारे,तालुका कृषी अधिकारी लाखनी.
लाखनी तालुक्यात अतिवृष्टीने ४५२ घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:01 IST
लाखनी तालुक्यात गुरूवारी झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार उडाला होता. लाखनीसह अनेक गावे जलमय झाली होती. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले. तहसील कार्यालयाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले असून अंशता नुकसान झालेल्या घरांची संख्या ४२५ असून यात ३९ लाख ५० रूपयांचे नुकसान झाले. तर नऊ घरे पूर्णत: बाधित झाली असून त्यात सहा लाख २५ हजार रूपयांचे नुकसान झाले.
लाखनी तालुक्यात अतिवृष्टीने ४५२ घरांची पडझड
ठळक मुद्दे४६ लाखांचे नुकसान : महसूल विभागाचे सर्व्हेक्षण, नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्या