४५ वनकामगारांना सेवा उपदान मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2015 00:45 IST2015-04-25T00:45:17+5:302015-04-25T00:45:17+5:30
वनविकास महामंडळ वन प्रकल्प विभाग भंडारा येथील सेवानिवृत्त झालेल्या ४५ वनकामगारांना २ लाख ५६ हजार ३७० रुपये सेवा

४५ वनकामगारांना सेवा उपदान मिळणार
प्रकरणाला मंजुरी : तीन वर्षानंतर मिळाले यश
भंडारा : वनविकास महामंडळ वन प्रकल्प विभाग भंडारा येथील सेवानिवृत्त झालेल्या ४५ वनकामगारांना २ लाख ५६ हजार ३७० रुपये सेवा उपदानाची रक्कम महाव्यवस्थापक नागपूर प्रदेश नागपूर यांनी मंजुर करुन वाटपासाठी विभागीय व्यवस्थापक वन प्रकल्प विभाग भंडारा यांचेकडे नावासह यादी पाठविली आहे.
महाराष्ट्र राज्य वनकर्मचारी व वन मजुर संघटना नागपूर विभाग भंडाराचे पदाधिकाऱ्यांनी मागील ३ वर्षापासुन सेवा उपदानाची रक्कम वनकामगारांना मिळण्यासाठी विभागीय व्यवस्थापक, महाव्यवस्थापक नागपूर, व्यवस्थापकीय संचालन नागपूर व सचिव वने महाराष्ट्र राज्य यांचेशी प्रत्यक्ष चर्चा व पत्रव्यवहार करुन वनविकास महामंडळात बारमाही रोजंदारीवर काम करणाऱ्या आणि सेवा निवृत्त कामगारांना सन १९७४ ते सन १९७९ पर्यंत कमी प्रदान केलेली सेवा उपदानाची रक्कम देण्यासाठी पाठपुरावा केला.
प्रसंगी ३-४ वेळा आमरण उपोषणाचा मार्गही पत्करला होता. नव्यानेच रुजू झालेले विभागीय व्यवस्थापक डी. एस. इंगोले यांनी संघटनेची मागणी रास्त असल्याचे आणि कमी दिलेली सेवा उपदानाची रक्कम देण्यास हरकत नसल्याचा पाठ पुरावा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केल्यामुळे सन १९७४ ते १९७९ या कालावधीची एकूण ५ वर्षाची रक्कम २ लाख ५६ हजार ३७० रुपये एकूण ४५ वनकामगारांना महाव्यवस्थापक नागपूर यांनी मंजूर केली ही रक्कम विभागीय व्यवस्थापक एफ.डी.सी.एम भंडारा यांचेकडे वाटपसाठी पाठविली आहे. जे वनकामगार हयात नसतील तर त्यांचे वारसदारांनी वारसान हक्क प्रमाणपत्र प्राप्त करुन विभागीय व्यवस्थापक वन प्रकल्प विभाग भंडारा यांचे कार्यालयात जाऊन द्यावे व धनादेश प्राप्त करावे असे कळविण्यात आले आहे.
चर्चेत महाराष्ट्र राज्य वन कर्मचारी व वनमजुर संघटना नागपूरचे वतीने केंद्रीय संघटक ललितकुमार उचिबगले, कार्याध्यक्ष संपतराव खोब्रागडे, एफडीसीएम विभागाचे अध्यक्ष प्रकाश नंदागवळी, सचिव पुरुषोत्तम वालदे, उपाध्यक्ष इश्वर वघारे, सुदेश रामटेके, प्रकाश लांजेवार व काळसर्पे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)