पवनी अभयारण्यात ४४४ वन्यप्राण्यांची गणना

By Admin | Updated: May 22, 2014 23:37 IST2014-05-22T23:37:13+5:302014-05-22T23:37:13+5:30

उमरेड-कºहांडला अभयारण्यांतर्गत येणार्‍या पवनी वन्यजीव अभयारण्यात करण्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या गणनेत ४४४ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. या गणनेत ४०

444 Wildlife Count in Pawni Wildlife | पवनी अभयारण्यात ४४४ वन्यप्राण्यांची गणना

पवनी अभयारण्यात ४४४ वन्यप्राण्यांची गणना

पवनी वनक्षेत्र : ४५ कर्मचार्‍यांचा सहभाग, पर्यटकांची टक्केवारी वाढली

गोसेबुज : उमरेड-कºहांडला अभयारण्यांतर्गत येणार्‍या पवनी वन्यजीव अभयारण्यात करण्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या गणनेत ४४४ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. या गणनेत ४० वनकर्मचारी व पाच अशासकीय सदस्यांचा समावेश होता. या अभयारण्याची शान ठरलेल्या 'जय' नामक वाघाची व वाघीनीची नोंद उमरेडजवळ करण्यात आली. तालुक्यात झपाट्याने वाढत असलेल्या पर्यटन क्षेत्रामुळे या अभयारण्यातही मोठ्या संख्येने पर्यटक भेटी देत आहेत. पवनी वन्यजीव अभयारण्याला २०१३ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजूर मिळाल्यानंतर जागतिक वनदिनी २१ एप्रिल रोजी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यासाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. जंगलातील रस्ते, कृत्रीम पानवठे व हँडपंप तयार करण्यात आले आहे. प्रशिक्षित गाईडची नियुक्ती करण्यात आली आहे. अभयारण्यात घनदाट जंगल असून क्षेत्र विस्तीर्ण असल्यामुळे या क्षेत्रात वाघ, बिबट व अन्य वन्यप्राण्यांचा संचार असतो. ५० चौरस कि़मी. क्षेत्रातील जंगलात वन्यप्राणी गणना करण्यात आली. या करीता २० पानवठ्यावर मचान उभारण्यात आले होते. या गणनेत दोन अस्वल, ४० गव्हे, ४७ चितळ, ६२ सांभर, ४१ भेकळ, ५५ निलगाय, ८४ रानडुक्कर, एक सायाळ, तीन ससे, एक मुंगूस, ७८ माकड, एक घोरपड व २९ मोर असे एकूण ४४ वन्यप्राणी आढळून आले. (वार्ताहर)

Web Title: 444 Wildlife Count in Pawni Wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.