१० वर्षांत ४२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By Admin | Updated: August 10, 2015 00:15 IST2015-08-10T00:15:42+5:302015-08-10T00:15:42+5:30

मागील १० वर्षांपासून सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहे.

42 farmers suicides in 10 years | १० वर्षांत ४२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

१० वर्षांत ४२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

संजय साठवणे साकोली
मागील १० वर्षांपासून सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहे. मात्र या उपाययोजनाचा लाभ खरोखरच शेतकऱ्यांना मिळतो काय? ही बाब मागील १० वर्षातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा पाहून लक्षात येते. साकोली तालुक्यात १० वर्षात एकूण ४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून यापैकी निम्माच म्हणजे २१ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळालेली आहे.
साकोली तालुक्यात रोजगाराच्या इतर सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात वडिलोपार्जित व्यवसाय म्हणून शेती केली जाते. मात्र निसर्गाचा लहरीपणा व सततची नापिकी व अपुरी सिचंनाची सोय यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी घेतलेले कर्जही फेडता येत नसल्याने बँकाही त्यांना कर्ज देण्यास नकार देते. परिणामी शेतकऱ्यांना पर्याय म्हणून खासगी सावकाराच्या पाशात पडावे लागते.
शेवटी कर्जाला कंटाळून आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. शासनाचे कठण्ीा नियम, याच्यामुळे मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबीयांना शासन आर्थिक मदतीपासून दूर ठेवते. आजही बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरी आर्थिक टंचाईमुळे ‘त्या’ कुटुंबावर दाहक परिस्थिती ओढवलेली आहे.
२१ मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली असून उर्वरित प्रकरणे अपात्र करण्यात आली आहेत.
सिचंन प्रकल्प अपुर्णावस्थेत
साकोली तालुक्यात निम्न चुलबंद प्रकल्प, भिमलकसा प्रकल्प व घानोड येथील भुरेजंजी सिंचन प्रकल्प आहेत. यापैकी निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम मागील २० वर्षांपासुन सुरु आहे. काम अपुर्णच आहे तर भिमलकसा प्रकल्पाचे ७५ टक्के काम पुर्ण झाले असून उर्वरित काम वनकायद्यात अडकले होते. तीन वर्षापुर्वी वनकायद्यापासून सुटका झाली असली तरी निधी अभावी व केंद्रीय परवानगीअभावी हेही प्रकल्प रखडले आहे. भुरेंजंगी प्रकल्पाची सुरुवात झाली नाही तर हे तिन्ही प्रकल्प पुर्णत्वास आले तर शेतीला सिंचनाची सोय होईल व शेतकरी आत्महत्या रोखण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते.
कृषी पंपाना वीज जोडणीची प्रतीक्षा
बऱ्याच अश्ांी शेतकऱ्यांनी जसे जगेल तसे बोरवेल किंवा विहीरी शेतात खोदल्या. त्यांना वीजवितरण कंपनीने तात्काळ कनेक्शन दिल्यास आजुबाजुच्याही शेतकऱ्यांला पाण्याची सोय होउ शकते. त्यामुळे शेतकरी निसर्गावर अवलंबून राहणार नाही. शासनाने याकडेलक्ष देण्याची गरज आहे.
या शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
सन २००५ ला सुकराम पुस्तोडे (३५), रा. साकोली, फकीर खंडाईत (५०) रा. वडद, चंद्रभान वैद्ये (३५) रा. जांभळी. २००६ ला व्यंकट ब्राह्मणकर (३०) रा. महालगांव, मोरेश्वर बहेकार (४८) रा. पळसगाव, रमेश कापगते (३६) रा. सेंदुरवाफा, विठोबा हेमणे (५०) रा. महालगाव, मोरेश्वर भेंडारकर (२४) रा सुकळी, भागरथा तिरपुडे (५०)रा. बोदरा, पाडुरंग रोकडे (५२) परसटोला, बाळकृष्ण टेंभुरकर (६०) साकोली, सतीश बोरकर (३५) खंडाळा, घनश्याम टेंभरे (४५) मोखे किन्ही, रमेश भेंडारकर (३८) पळसगाव सोनका. सन २००७ ला विश्वनाथ ब्राह्मणकर (४०) निलज, युवराज फुंडे (३७) धर्मापुरी, विनायक समरीत (४५) पिंडकेपार, रंजित हुमणे (२५) बम्पेवाडा, दामोधर टेंभरे (५८) मोखे किन्ही, सन २००८ ला ग्यानीराम भोंडे (४५) सातलवाडा, कोलहु फुंडे (४५) बाम्पेवाडा, प्रकाश किरणापुरे (४५) किन्ही मोखे, डकरु टेकाम (७५) पिटेझरी, सन २००९ ला मनोहर गहाणे (४८) निलज, मोरेश्वर कोरे (३६) निलज, सन २०१० ला हरगोविंद हरणे (३८) सानगांव, विश्वनाथ शेंडे (५५) सराटी. सन २०११ ला राजेंद्र कोरे (३५) रा. पळसगाव, आसाराम खोटेले (४०) रा. धर्मापुरी, शंकर नगरकर (४५) विहिरगांव बुराड्या, सन २०१२ ला दिलीप वाढई (४०) एकोडी, मनोहर कान्हेकर (३५) सानगडी, हरिश्चंद्र नेवारे (४५) केसलवाडा, सदारमा चांदेवार (६२) सासरा. सन २०१४ ला प्रमोद कांबळे (४५) रा. धर्मापुरी, दयाराम कोरे (६५) पळसगांव सोनका, सखाराम दोनोडे (४२) परसटोला, महादेव पर्वते (३८) उमरझरी, रमेश रहांगडाले (३६) व बिसन गिऱ्हेपुंजे (६५) किन्ही एकोडी, भागरता कान्हेकर (६८) गिरोला. सन २०१५ ला देवराम डोंगरवार घानोड आमगाव या ४२ शेतकऱ्यांनी कर्जबारीपणाला कंटाळून आत्महत्या केली

Web Title: 42 farmers suicides in 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.