समुपदेशनाने ४१५ वाद निकाली
By Admin | Updated: September 7, 2016 00:44 IST2016-09-07T00:44:18+5:302016-09-07T00:44:18+5:30
संसार म्हणजे प्रेम, माया, ममता आणि वाद सुद्धा. हेच कौटुंबिक वाद कधी कलहाचे कारण ठरतात.

समुपदेशनाने ४१५ वाद निकाली
दाम्पत्यांमधील वादांवर तोडगा : मागील चार वर्र्षांतील कारवाई
राहुल भुतांगे तुमसर
संसार म्हणजे प्रेम, माया, ममता आणि वाद सुद्धा. हेच कौटुंबिक वाद कधी कलहाचे कारण ठरतात. बनतात आणि मार्ग उरतो तो विभक्त होण्याचा. संसार हा फक्त दोघांचा नसून त्यामध्ये दोन कुटुंब सहभागी असतात आणि अशीच मोडलेली कुटुंब जोडण्याचे कार्य समुपदेशन केंद्र महिला दक्षता समिती करीत आहे. समुपदेशाने चार वर्षात ४१५ वाद निकाली काढण्यात आले आहेत.
१ आॅक्टोबर २०१२ पासून प्रगती महिला समुपदेशन केंद्र हे तुमसर पोलीस ठाण्यामध्ये गत चार वर्षापासून सुरु आहे. घटस्फोटांचे प्रमाण कमी करण्यासाठी या केंद्राकडून समुपदेशनाचे कार्य करण्यात येते.
घटस्फोट घेण्यापूर्वी संबंधित दांपत्याचे समुपदेशन करण्याचे कार्य महिला दक्षता समितीकडून करण्यात येते.गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे याकरिता हे समुपदेशन कार्यरत आहे. या समुपदेशन केंद्राचे समुपदेशक म्हणून कुंदा गायधने, स्मिता उरकुडे यांचे कौतूकास्पद कार्य सुरु आहे. गत चार वर्षापासून कौटुंबिक कलहातून निर्माण झालेले ७४० प्रकरणे आता पर्यंत या समुपदेशन केंद्रात दाखल झाले.
त्यातील सुमारे ४१५ प्रकरणात समुपदेशक गायधने उरकुडेच्या समुपदेशाने दांपत्यामधील वाद मिटवून त्यांचे एकत्रिकरण करण्यात आले. दोन अत्याचारित महिलांना मनोधर्य योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. तर ७ प्रकरणात दांपत्य समजण्यापलिकडचे झाल्याने गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचार २००५ कायद्यांतर्गत १० प्रकरणात खटला चालविण्यात आला. त्यातूनही दोन कुटुंबाचे परत मनोमिलन घडवून आणून दांपत्याच्या संसाराचे बंध जोडण्याचे कौतुकास्पद कार्य समुपदेशन केंद्र करीत आहे. त्याचबरोबर किशोरवयीन मुलींचे लैंगिक शोषण थांबविण्याकरिता वेळोवेळी शाळा, कॉलेज महाविद्यालयात या समुपदेशक जावून तिथे समुपदेशन देतात.
त्याचबरोबर तुमसर तालुक्यातील खेड्यापाड्यातही जावून महिला अत्याचारावर रोकथाम या करिता जनजागृती करण्याचे कार्य तुमसर पोलीस स्टेशनमध्ये सुरु असलेल्या समुपदेशन केंद्रात सुरळीत सुरु आहे.