एटीएममधून पळविले ४१ हजार रूपये
By Admin | Updated: June 30, 2015 00:45 IST2015-06-30T00:45:45+5:302015-06-30T00:45:45+5:30
एटीएममध्ये रक्कम तपासणी करून देण्याच्या नावावर एका भामट्याने भूलथापा देऊन ४१ हजार रूपये पळविल्याची घटना घडली.

एटीएममधून पळविले ४१ हजार रूपये
साकोली : एटीएममध्ये रक्कम तपासणी करून देण्याच्या नावावर एका भामट्याने भूलथापा देऊन ४१ हजार रूपये पळविल्याची घटना घडली.
येथील आर. टी. हेडावू हे एल.आय.सी. चे पैसे जमा झाले की नाही, हे बघण्यासाठी एटीएममध्ये गेले असता, तिथे सुरक्षा रक्षक नव्हता त्यामुळे हेडावू यांना अडचण निर्माण झाली. यावेळी जवळच असलेल्या एका अज्ञात इसमाने एटीएम मधुन बॅलन्स चेक करून देतो म्हणून कार्ड बदली करून टाकले. हे हेडावू यांच्या लक्षात आले नाही.
पैशांची आवश्यकता असल्यामुळे हेडावू त्याच ए.टी.एम. मधून पैसे काढण्याकरिता गेले असता, हा प्रकार त्यांच्या लक्षात गार्डनी आणून दिले. त्यामूळे त्यांनी त्यांच्या बँकेचे खाते तपासले असता ४१,००० रुपये काढण्यात आल्याचे दिसून आले.
याप्रकरणी त्यांनी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली व बँक व्यवस्थापकालाही तक्रार देण्यात आली. मात्र, बँकेने सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहण्याची तसदी घेऊन भामट्याला शोधण्यात मदत केली नसल्याचा आरोप हेडावू यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भामट्याविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. यामुळे साकोलीत भितीचे वातावरण पसरले आहे. (तालुका प्रतिनिधी)