जिल्ह्यातील ग्रामीण भागातही एसटीच्या ४०४ बसफेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST2021-07-21T04:24:10+5:302021-07-21T04:24:10+5:30
सध्या एसटी ८४,७४५ कि.मी. धावत आहे, तर यामध्ये शहरी भागात ५८,२५९ कि.मी. तर ग्रामीणमध्ये २६४८६ कि.मी. एसटी धावते आहे. ...

जिल्ह्यातील ग्रामीण भागातही एसटीच्या ४०४ बसफेऱ्या
सध्या एसटी ८४,७४५ कि.मी. धावत आहे, तर यामध्ये शहरी भागात ५८,२५९ कि.मी. तर ग्रामीणमध्ये २६४८६ कि.मी. एसटी धावते आहे. तरीही काही बसफेऱ्यांवर मात्र निवडक एक-दोनच प्रवासी राहत असल्याने, या मार्गावरील बसेस मात्र नाईलाजास्तव बंद करण्यात आल्या आहेत. या बसेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत असली तरी, बसफेऱ्यांचा खर्चही निघत नाही. जून महिन्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने एसटी महामंडळाच्या बसेस पूर्ण क्षमतेने धावू लागल्या आहेत. आता कोरोनानंतर ७५६ बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील सहाही आगारातून दररोज अनेक बसेस शहरी भागासह ग्रामीणमध्ये धावत आहेत. मात्र अजूनही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही गावांतील नागरिकांना आजही खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे. यासाठी एसटी महामंडळाने पूर्वीप्रमाणे बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.
बॉक्स
काही गावांना घ्यावा लागतो खासगी वाहनांचा आधार
भंडारा जिल्ह्यात अनेक मार्गावर एसटी बसेस धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे. मात्र जिल्ह्यातील काही भागात मात्र अजूनही एसटी बस पोहोचत नसल्याने त्या गावातील प्रवाशांना खासगी टमटम, ऑटो रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. भंडारा आगारात ७७ बसेस असून यातील अनेक बसेस ग्रामीणमध्येच फिरतात. सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक बसेस धावत आहेत.
कोट
बसेस सुरू झाल्याने आला जिवात जीव ...
कोट
मागील काही दिवस कोरोना वाढल्याने एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे शहर तालुका स्तरावर काही प्रमाणात ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. तरीही नागपूरसाठी रात्रीच्या बसेस सुरू कराव्यात, अशी आमची मागणी आहे.
- श्याम आकरे, प्रवासी
कोट
शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी खासगी, एसटी बसेस आहेत. परंतु ग्रामीण भागातील एसटी बससेवा खूप गरजेची आहे. एसटीचा शेतकऱ्यांसह सर्वसामान्य शेतमजुरांना खूप मोठा आधार मिळतो. अनेकदा खासगी वाहनातून प्रवास करणे सर्वसामान्यांना परवडणारे नसते.
- संदीप मेश्राम, प्रवासी
कोट
भंडारा आगारात ७७ एसटी बसेस आहेत. विशेष म्हणजे यातील ६० टक्के बसेस ग्रामीण भागातच धावत आहेत. खेडेगावातीलही सध्या अनेक बसेस सुरू आहेत. काही गावांत मुक्कामी बस आहेत. अगदीच दोन प्रवासी असतील, तर ते एसटीलाही परवडणारे नाही. ज्या मार्गावर गरज असेल तेथे प्रवाशांच्या मागणीनुसार त्या मार्गावर बसेस लवकर सुरू करता येतील.
- फाल्गुन राखडे, भंडारा आगारप्रमुख