तीन व्यापाऱ्यांना ४० हजारांचा दंड
By Admin | Updated: September 30, 2015 00:47 IST2015-09-30T00:47:56+5:302015-09-30T00:47:56+5:30
कमी दर्जा व लेबलदोषचे अन्नपदार्थ विक्री करणााऱ्या तीन व्यावसायीकांना ४० हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

तीन व्यापाऱ्यांना ४० हजारांचा दंड
आयुक्तांची कारवाई : कमी दर्जाचे पदार्थ विक्री प्रकरण
भंडारा : कमी दर्जा व लेबलदोषचे अन्नपदार्थ विक्री करणााऱ्या तीन व्यावसायीकांना ४० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. हा निर्णय अधिकारी व सह आयुक्त (अन्न) शिवाजी देसाई यांनी दिला. यात भंडारा येथील दोन तर गोंदिया येथील एका व्यापाऱ्याचा समावेश आहे.
भंडारा येथील तकिया वॉर्डातील लक्ष्मी बेकरी, मोहाडी येथील श्री जगदंबा किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्स तर गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील बिकानेर स्विट अॅण्ड रेस्टॉरेंटचा समावेश आहे. अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. पी. धवड यांनी दोन कारवाई केल्यात. त्यात मोहाडी येथील शिवाजी चौकातील श्री जगदंबा किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्समधून सुरेश वडतकर हे दिपक ब्राण्डचे फिल्टर्ड शेंगदाणा तेलची विक्री करीत होते. या खाद्यतेलाचा साठा जप्त करून तपासणी केली होती. यात नमुना कमी दर्जाचा आढळून आला होता. तर भंडारा शहरातील तकीया वॉर्डातील लक्ष्मी बेकरीची तपासणी केली असता, बेकरी मालकाकडून विक्री करण्यात येत असलेली लक्ष्मी ब्राण्ड पाव यात लेबलवर पोषक तत्वाची माहिती नसल्याने लेबलदोष आढळून आला. हे दोन्ही प्रकरण धवड यांनी न्यायदानासाठी न्यायनिर्णय अधिकारी नागपूर यांच्याकडे दाखल केले होते.
तिसरे प्रकरण गोंदिया जिल्ह्यातील आमगांव येथील नारायणसिंग नरसिंग राजपुरोहित यांचे बिकानेर स्विट अॅण्ड रेस्टॉरेंटचे आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्र. नि. काळे यांनी बिकानेरच्या 'नमकीन' या खाद्यपदार्थाची तपासणी केली असता त्यात दोष आढळून आला. हे तिन्ही प्रकरण नागपूरचे न्यायनिर्णय अधिकारी व सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिला. त्यांनी तिन्ही व्यावसायीकांना अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत दोषी ठरविले. यात बिकानेर व बेकरी मालकाला प्रत्येकी १० हजारांचा तर मोहाडी येथील वडतकर यांना २० हजारांचा द्रव्यदंड ठोठावल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त बी. जी. नंदनवार यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)