४० वर्ष जुने अतिक्रमण हटविले

By Admin | Updated: April 23, 2015 00:18 IST2015-04-23T00:18:36+5:302015-04-23T00:18:36+5:30

अतिक्रमण गाव विकासाला अभिशाप ठरले आहे. मुठभर लोकांनी हक्काचा दुरुपयोग करीत ऐन मोक्याच्या जागेवर अतिक्रमण करून...

40 years old encroach deleted | ४० वर्ष जुने अतिक्रमण हटविले

४० वर्ष जुने अतिक्रमण हटविले

सरपंचांचा पुढाकार : ४.२५ एकरातील ढोरफोडीची जमीन मोकळी
पालांदूर : अतिक्रमण गाव विकासाला अभिशाप ठरले आहे. मुठभर लोकांनी हक्काचा दुरुपयोग करीत ऐन मोक्याच्या जागेवर अतिक्रमण करून सामान्य माणसाच्या अधिकारावर गदा आणला आहे. गाव माझा मी गावाचा म्हणत मऱ्हेगावचे सरपंच शामा बेंदवार यांनी ४० वर्षे जुने ढोरफोडीवरील अतिक्रमण गावकऱ्यांच्या मदतीने हटविले.
गाव विकासाकरिता दूरदृष्टी अत्यंत महत्वाची असते. गावचा पुढारी ज्या दृष्टीचा असेल तसा गाव घडेल. राष्ट्रसंत तुकडोजींच्या स्वप्नातील ग्राम घडविण्याची मनिषा बाळगलेले बेंदवार यांनी गावाला नवीन दिशा दिली. मुख्य रस्ते विकसीत केले. गावात शुद्ध पाण्याकरिता नळयोजना आणली. गावातील चौक सुशोभीत करून रहदारीकरिता असलेली अडचण दूर केली. गावाशेजारील ढोरफोडीत नागरिकांनी अतिक्रम केले. सर्वांच्या सहकार्याने हे अतिक्रम काढण्यात आले. मागील महिन्यात स्मशानभूमी अतिक्रमणातून मोकळी केली. पुढच्या हप्त्यात नर्सरीतील अतिक्रमण निर्मूलन करून सीताफळाची लागवड करण्याचे धेय्य आहे. याकरिता ग्रामसभेला शस्त्र बनविले आहे. आमदार, खासदार, जिल्हा परिषद अंतर्गत निधी मिळवून गाव विकसीत करीत आहेत. अतिक्रमण निर्मूलनाच्यावेळी सरपंच शामा बेंदवार, उपसरपंच वामन मदनकर, सदस्य प्रशांत फुल्लुक्के, सिंधू थेर, गायत्री बेंदवार, प्रेमराज गोटेफोडे, शामराव बेंदवार, सुरेश राऊत, रामू ब्राम्हणकर तथा गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: 40 years old encroach deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.