एसटीमधून ४० हजार रुपयांची दारु जप्त

By Admin | Updated: June 28, 2015 00:46 IST2015-06-28T00:46:51+5:302015-06-28T00:46:51+5:30

एसटी बसमधून दारुची वाहतूक करण्यात येत होती. पोलीस पथकाने सोनी येथे बसची झडती घेतली असता ..

40 thousand cash seized in ST | एसटीमधून ४० हजार रुपयांची दारु जप्त

एसटीमधून ४० हजार रुपयांची दारु जप्त

सोनी येथील कारवाई : महिलेला अटक
लाखांदूर : एसटी बसमधून दारुची वाहतूक करण्यात येत होती. पोलीस पथकाने सोनी येथे बसची झडती घेतली असता त्यात एका महिलेकडून ४० हजाराची दारु जप्त करण्यात आला. ही कारवाई आज उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने सोनी येथे केली.
पोलिसांनी दारुची वाहतूक मोठया प्रमाणात होत असल्याने सीमेलगत चौकी सुरु केली आहे. सोनी बसस्थानकावर असलेल्या पोलीस चौकी पथकाने ही कारवाई केली. एसटीमधून प्रवास करणाऱ्यांची झडती घेतल्या जात नाही. याबाबीचा फायदा उचलत सदर महिलेने अर्जुनी मोर येथून एका बारमधून देशी व विदेशी दारुचा साठा सोबत घेवून गडचिरोलीकडे निघाली होती. दरम्यान सोनी येथे बसस्थानक चौकी येथील पथकाने सुषमा शाहू (४०) रा. चंद्रपूर यांच्या बॅगांची झडती घेतली असता त्यामध्ये ४० हजार रुपये किंमतीची दारु आढळून आली. तिची चौकशी केली असता. अर्जुनी मोर येथील बार व्यवसायीकांकडून ही दारु खरेदी केल्याचे तीने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी महिलेविरुध्द गुन्हा नोंदवून अटक केली आहे. (तालूका प्रतिनिधी)

Web Title: 40 thousand cash seized in ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.