शालेय गुणवत्ता तपासणीसाठी आता ४० पथके

By Admin | Updated: January 14, 2015 23:02 IST2015-01-14T23:02:17+5:302015-01-14T23:02:17+5:30

जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी याकरिता राज्य शासनाने आमची शाळा आमची मुले उपक्रम राबविण्याचा आदेश काढला होता. भंडारा जिल्ह्यात या उपक्रमाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही.

40 Squads now to check quality of school | शालेय गुणवत्ता तपासणीसाठी आता ४० पथके

शालेय गुणवत्ता तपासणीसाठी आता ४० पथके

मोहन भोयर - भंडारा
जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी याकरिता राज्य शासनाने आमची शाळा आमची मुले उपक्रम राबविण्याचा आदेश काढला होता. भंडारा जिल्ह्यात या उपक्रमाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी करण्याचा निर्णय घेऊन ४० पथक तयार केले. समाधानकारक कार्य न करणाऱ्या शिक्षक व गट शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी व लाखनी येथील गट शिक्षणाधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे, हे विशेष.
जिल्हा परिषदेच्या शाळा टिकून राहून इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आव्हान देण्याची क्षमता तयार व्हावी याकरिता आमची शाळा आमची मुले हा गुणवत्ता वाढ उपक्रम राबविण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला होता. जिल्ह्यात या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला नाही. कागदोपत्री अहवाल पाठवून पूर्तता करण्यात आली होती.
याची दखल जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती रमेश पारधी यांनी घेतली. त्यांनी मासीक सभेत शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
याकरिता तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत ४० पथके तयार केले. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु झाली आहे. समाधानकारक कार्य न केल्याचा ठपका तुमसर, मोहाडी, लाखनीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखून कारवाई करण्यात आली. ज्या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पथकाला दिसली नाही. त्या शिक्षकाची वेतनवाढ रोखण्यात येणार आहे.
प्रत्येक शाळांचा गुणवत्ता तपासणीत तालुका व जिल्हास्तरावर ४० पथके तयार करण्यात आले आहे. तालुकास्तरीय पथकात केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी व गट शिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर जिल्हास्तरावरील पथकात उपशिक्षणाधिकारी पथकाचे प्रमुख असून जिल्हास्तराचे शिक्षण विस्तार अधिकारी व अन्य वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तालुका व जिल्हा तपासणी पथकाचे येथे क्रास तपासणी होणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: 40 Squads now to check quality of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.