३.९ रिश्टर स्केलची नोंद
By Admin | Updated: July 25, 2015 01:15 IST2015-07-25T01:15:36+5:302015-07-25T01:15:36+5:30
गुरुवारला रात्री ८.०६ मिनीटांनी जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

३.९ रिश्टर स्केलची नोंद
भंडारा : गुरुवारला रात्री ८.०६ मिनीटांनी जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हा भूकंप ३.९ रिश्टर स्केलचा होता. या भूकंपामुळे नागरिक घराबोहर आले होते. मात्र कोणतीही जिवीत किंवा वित्तहानी झालेली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी आणि तुमसर या तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के ५ सेकंदाकरीता जाणवले. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. लोक घाबरुन घराबाहेर रस्त्यावर आले. भूकंपाची माहिती देणारे दूरध्वनी संदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. भूकंपाच्या घटनेनंतर पोलीस विभागाला रात्री गस्त वाढविण्याचे निर्देश देण्यात आले.
तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व व्यवस्थापन कक्ष व पोलीस नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आले होते. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मदतीसाठी नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांक (०७१८४-२५१२२२) यावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकूमार यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)