जिल्ह्यत रविवारी ३८ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:32 IST2021-03-08T04:32:58+5:302021-03-08T04:32:58+5:30
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०६ के भंडारा : जिल्ह्यात रविवारी २० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे ...

जिल्ह्यत रविवारी ३८ कोरोना पॉझिटिव्ह
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०६ के
भंडारा : जिल्ह्यात रविवारी २० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३ हजार २४१ झाली आहे. रविवारी ३८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ हजार ९२९ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०६ टक्के आहे.
रविवारी १४६१ व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ३८ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत १ लाख ४१ हजार ८११ व्यकींच्या घशातील स्रावाची तपासणी करण्यात आली. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील १३, तुमसर १४, पवनी २, लाखनी ५, साकोली तालुक्यातील ४ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात ३६१ क्रियाशील रुग्ण आहेत. कोरोनामुळे मृतांची संख्या एकूण ३२७ झाली आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ०२.३४ टक्के एवढा आहे.
शासकीय व खासगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.
बॉक्स
महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोमवारी ८ मार्च रोजी महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. पाच केंद्रांवर ही मोहीम आहे. सामान्य रुग्णालय भंडारा, प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूर, आरोग्यवर्धिनी केंद्र गणेशपूर भंडारा, प्राथमिक आरोग्य केंद्र आंधळगाव ता. मोहाडी व प्राथमिक आरोग्य केंद्र नाकाडोंगरी ता. तुमसर या केंद्रावर महिला दिनानिमित्त विशेष लसीकरण मोहीम आहे. महिलांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.