३८ ट्रक चालक मालकांवर कारवाई

By Admin | Updated: June 10, 2016 00:55 IST2016-06-10T00:55:23+5:302016-06-10T00:55:23+5:30

भंडारा जिल्ह्यात राजरोसपणे रेती चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रथमच जिल्ह्यात एकाचवेळी ३८ ट्रकचालकावर कारवाई करून फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

38 Action on truck driver owners | ३८ ट्रक चालक मालकांवर कारवाई

३८ ट्रक चालक मालकांवर कारवाई

प्रकरण रेती चोरीचे : तलाठी यांची पोलिसात तक्रार
वरठी : भंडारा जिल्ह्यात राजरोसपणे रेती चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रथमच जिल्ह्यात एकाचवेळी ३८ ट्रकचालकावर कारवाई करून फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर कारवाई बेटाळा घाटावरून अवैध रेती वाहतुक करणाऱ्या मिनाक्षी रामटेके यांच्या तक्रारीवरून वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत भादंवी ३७९, १८६ व १०९ गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तहसीलदार भंडारा यांच्या आदेशान्वये तलाठी मिनाक्षी रामटेके हे दाभा तपासणी नाक्यावर सकाळी ८ ते २ दरम्यान कर्तव्यावर हजर होते. उपरोक्त कालावधीत या नाक्यावरून रेती भरून जाणाऱ्या ट्रकची तपासणी करून आवश्यक कागदपत्र आणि क्षमतेपेक्षा जास्त लोड वाहतुक तपासणीची जबाबदारी बजावत असतात.
या मार्गावरून जाणाऱ्या वाहनानी तपासणी करीता वाहन न थांबवता पळून गेले. तपासणी न करता पळून जाणाऱ्या ३८ ट्रकविरूद्ध कारवाई करण्याच्या संदर्भात तलाठी यांनी वरठी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
गौण खनिज रेतीची अवैध वाहतुक करून शासकीय मालमत्तेची चोरी केल्यामुळे ट्रक चालक व मालक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रत्येक ट्रकमध्ये ३ ब्रास रेती असे एकूण ११४ ब्रास रेती घटनेच्या दिवशी चोरी झाली असून यांची शासकीय नियमानुसार अंदाजे २ लक्ष २८ हजार रूपये किंमत आहे. तलाठी यांच्या तक्रारी वरून ३८ ट्रकविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर वर्मा यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम गभने करीत आहे. (वार्ताहर)

Web Title: 38 Action on truck driver owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.