३६ टक्के करवसुली अजूनही शिल्लक

By Admin | Updated: March 21, 2017 00:23 IST2017-03-21T00:23:27+5:302017-03-21T00:23:27+5:30

येथील नगर परिषदेच्या कर विभागाने सन २0१६-१७ या आर्थिक वर्षात आतापर्यंत मालमत्ता व पाणी कर मिळून ३ कोटी १६ लक्ष ५७ हजार रूपयांची कर वसुली केली आहे.

36 percent tax collection still left | ३६ टक्के करवसुली अजूनही शिल्लक

३६ टक्के करवसुली अजूनही शिल्लक

पालिका प्रशासनाची बेधडक मोहीम : ३.१६ कोटींची करवसुली
भंडारा : येथील नगर परिषदेच्या कर विभागाने सन २0१६-१७ या आर्थिक वर्षात आतापर्यंत मालमत्ता व पाणी कर मिळून ३ कोटी १६ लक्ष ५७ हजार रूपयांची कर वसुली केली आहे. यावषीर्चे पालिकेचे कर वसुलीचे उद्दिष्ट ४ कोटी ९६ लक्ष ६८ हजार २८२ रुपये एवढे होते. आतापर्यंत ही करवसुली ६४ टक्यांवर पोहोचली आहे. मार्च महिन्यात शंभर टक्के करवसुली नगरपालिका प्रशासनाला अपेक्षित आहे.
मागील वीस दिवसांपासून भंडारा नगरपालिकेच्या कराच्या वसुलीसाठी पालिकेने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून थकबाकीदाराच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. थकबाकी चुकविणाऱ्यांवर जप्तीचीही कारवाई करण्यात आली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे येणाऱ्या जबाबदाऱ्या व कर्तव्य स्वत:च्या आर्थिक क्षमतेवर पालिकांनी पार पाडणे शासनाला अपेक्षित आहे. मालमत्ता करापासून प्राप्त होणारे उत्पन्न हे स्वराज्य संस्थाच्या महसूलचे मुख्य स्रोत आहे. प्रभावी कर वसुली झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थाची आर्थिक क्षमता वाढते. त्यामुळे राज्य शासनाचे करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होते. त्यामुळे ३१ मार्च अखेरपर्यंत कर वसुलीवर भर देऊन उद्दिष्टपूर्ती करण्याचा आदेश आहे. (प्रतिनिधी)

नोटाबंदीच्या काळातही ‘गुड रिस्पॉन्स‘
८ नोव्हेंबरला केंद्र सरकारने ५00 व एक हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली. तर ज्यांच्याकडे नोटा आहेत. त्यांनी कराच्या रूपात नोटा भराव्यात, असे आवाहन शासनाने केल्यानंतर भंडारा नगरपालिकेच्या तिजोरीत भंडारेकरांनी करापोटी लक्षावधी रूपयांची रक्कम जमा केली.

वसुलीची धडक मोहीम
भंडारा नगर पालिका हद्दीत २१ हजार ७५६ मालमत्ताधारक आहेत. यात घर तथा व्यावसायिक मालमत्ता धारकांचा समावेश आहे. मालमत्ता कर, पाणी पट्टी तसेच इतर विविध स्वरूपाच्या करापोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी मालमत्ताधारकांकडे आहे. यामध्ये मालमत्ता कराची सर्वात जास्त थकबाकी आहे. त्यामुळे मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिका प्रशासनाकडून धडक मोहीम सुरू केली आहे. यामध्ये मोठया थकबाकीदारांचीमालमत्ता जप्तीच्या कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पालिका प्रशासनाच्या कारवाईकडे कानाडोळा करणाऱ्या मालमत्ताधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

मार्च महिन्यापर्यंत थकबाकीदारांनी मालमत्ता व इतर कर भरून नगर पालिकेला सहकार्य करावे. धडक मोहिमेअंतर्गत मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
-अनिल अढागळे,
मुख्याधिकारी, न.प. भंडारा.

Web Title: 36 percent tax collection still left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.