१० वर्षांत ३४० क्षयरुग्णांचा मृत्यू

By Admin | Updated: February 24, 2015 01:37 IST2015-02-24T01:37:51+5:302015-02-24T01:37:51+5:30

जिल्ह्यात मागील १० वर्षात ३४० क्षयरुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

340 Tuberculosis deaths in 10 years | १० वर्षांत ३४० क्षयरुग्णांचा मृत्यू

१० वर्षांत ३४० क्षयरुग्णांचा मृत्यू

देवानंद नंदेश्वर ल्ल भंडारा
जिल्ह्यात मागील १० वर्षात ३४० क्षयरुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सन २०१३ मध्ये सर्वात अधिक ६९ क्षयरुग्णांचा मृत्यू झाला. १० वर्षाची आकडेवारी लक्षात घेतली असता जिल्ह्यात ५ हजार ३०२ रुग्ण या आजाराने बाधीत झाले. यातील ४ हजार २५ रुग्ण औषधोपचारानंतर सुधारित झाली.
क्षयरोग हा एक जीवघेणा आजार म्हणून प्राचिन काळापासून प्रचलीत आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या आजारावर प्रभावी औषधी उपलब्ध झाली. भंडारा जिल्ह्यात ८ एप्रिल २००२ पासून सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला. या अंतर्गत दोन थुंकी (ठसे) तपासून आजाराचे निश्चित निदान करण्यात येते. ही तपासणी विनामूल्य असते. जिल्हा क्षयरोग केंद्र भंडारा, उपजिल्हा रुग्णालय साकोली, तुमसर, ग्रामीण रुग्णालय पवनी, मोहाडी, लाखांदूर, सिहोरा, अड्याळ, पालांदूर. प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूर, लाखनी, जांब, गोबरवाही, कोंढा, सानगडी या ठिकाणी क्षय आजाराचे निदान करण्यात येते.
क्षयरोग आजाराविषयी मागील १० वर्षांची आकडेवारी लक्षात घेता

Web Title: 340 Tuberculosis deaths in 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.